श्वेता तिवारी हिने केले 43 व्या वर्षी जबरदस्त फोटोशूट, अभिनेत्रीने बेडरूममध्ये…
अभिनेत्री श्वेता तिवारी हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. श्वेता तिवारीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. श्वेता तिवारी सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच श्वेता तिवारी हिने खास फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीच्या फोटोंमुळे आता इंटरनेटचा पारा वाढल्याचे बघायला मिळतंय.
श्वेता तिवारी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. श्वेता तिवारी हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे फक्त मालिकाच नाही तर वेब सीरिजमध्येही धमाका करताना श्वेता तिवारी दिसत आहे. श्वेता हिचा फक्त अभिनयच नाही तर तिचे खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिलेले आहे. श्वेता तिवारी हिचे पहिले लग्न राजा चाैधरी याच्यासोबत झाले. मात्र, राजा चाैधरी याच्यावर अनेक गंभीर आरोप तिने केले. त्यानंतर तिने अभिनव कोहली याच्यासोबत लग्न केले. मात्र, श्वेताचे तिसरे लग्नही फार काळ टीकू शकले नाही. श्वेता तिवारी आणि राजा चाैधरी यांच्या मुलीचे नाव पलक तिवारी आहे. अभिनव कोहली आणि श्वेता तिवारीचा एक मुलगा आहे.
श्वेता तिवारी आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ एकटीच करते. श्वेता तिवारी हिने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिच्याकडून काही मोठे खुलासे करण्यात आले. श्वेता तिवारी हिने म्हटले की, आता मी शोमध्ये काम करू शकत नाही. कारण दररोज सेटवर जाऊन दहा ते पंधरा तास काम करणे शक्य नाही.
मला माझ्या मुलांना वेळ द्यावा लागतो शिवाय शूटिंगचे लोकेशनही दूर असते. अगोदर माझी आई मुलांकडे लक्ष देत असल्याने मला टेन्शन नव्हते. मात्र, आता ते शक्य नाही. श्वेता तिवारी हिने नुकताच एक फोटोशूट केले. श्वेता तिवारी हिच्या या फोटोशूटमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढलाय. श्वेता तिवारी हिने 43 व्या वर्षी अत्यंत बोल्ड फोटोशूट केले.
View this post on Instagram
श्वेता तिवारी हिने हे फोटोशूट बेडरूममध्ये केल्याचे दिसत आहे. आता श्वेता तिवारीचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते हे या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. एकाने कमेंट करत म्हटले की, कोण म्हणेल ही पलक तिवारीची आई आहे. दुसऱ्याने लिहिले की, काय लूक आहे…
तिसऱ्याने लिहिले की, अरे जबरदस्त लूक. श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. विशेष म्हणजे पलकला थेट सलमान खान याच्या चित्रपटात काम करण्याची थेट संधी मिळाली. पलक तिवारी ही इब्राहिम अली खान याला डेट करत असल्याचे सांगितले जातंय. यांचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले.