श्वेता तिवारी हिने केली पोलखोल, थेट म्हणाली, शिव्या दिल्याशिवाय तुम्हाला…
श्वेता तिवारी हिने मोठा काळ गाजवला आहे. श्वेता तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना श्वेता तिवारी कायमच दिसते. आता श्वेता तिवारी हिने अत्यंत मोठा खुलासा केलाय. ज्याची जोरदार चर्चा होत आहे.
श्वेता तिवारी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. श्वेता तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. श्वेता तिवारी हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. हेच नाहीतर श्वेता तिवारीने वेब सीरिजमध्येही धमाकेदार भूमिका केल्या आहेत. श्वेता तिवारी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना श्वेता तिवारी दिसते. गेल्या काही वर्षांपासून श्वेता तिवारी मालिकांपासून दूर आहे. हेच नाहीतर बिग बॉसमध्येही श्वेता तिवारी सहभागी झाली होती.
नुकताच आता श्वेता तिवारी हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना श्वेता तिवारी दिसली. श्वेता तिवारी हिने या मुलाखतीमध्ये थेट बिग बॉसच्या निर्मात्यांची पोलखोल केलीये. श्वेता तिवारी म्हणाली की, आमच्यावेळी फेमस कलाकारच बिग बॉसमध्ये सहभागी होत होते. त्यावेळी सांगितले जायचे की, लोकांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे.
हेच नाहीतर सकाळी उडल्यापासून तुमच्या दिवसाची सुरूवात कशी होते आणि मेकअप न करता तुम्ही कसे दिसता हे देखील त्यांना बघायचे असते. राग आल्यावर तुम्ही कसे भांडता हे बघण्यासाठी ते जास्त इच्छुक असतात. पुढे श्वेता तिवारी म्हणाली की, शोमध्ये तुम्हाला राहायचे असेल तर शिव्या द्याव्याच लागतात. कारण शोमध्ये तुम्ही शिव्या दिल्या तर त्यांना वाटते की, हा तुमचा खरा चेहरा आहे.
मुळात म्हणजे तुम्हाला लहानपणीपासून शिकवले जाते की, कोणीही शिव्या दिल्या तरीही शांतपणे बोला. मी सुध्दा माझ्या मुलाला हेच शिकवते. इकडे जर तुम्ही शोमध्ये भांडणे करत नसाल आणि शिव्या देत नसाल तर तुम्हाला शोच्या बाहेर काढले जाते. आता श्वेता तिवारी हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. खरोखरच बिग बॉसमध्ये असे होते का? हा प्रश्न विचारला जातोय.
श्वेता तिवारी ही बिग बॉस 4 ची विजेता देखील आहे. श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने नुकताच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. विशेष म्हणजे थेट सलमान खान यानेच पलक तिवारी हिला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. सलमान खानच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत पलक तिवारी दिसली. श्वेता तिवारी ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे.