अखेर ‘त्या’ गोष्टीवर श्वेता तिवारी हिने केला मोठा खुलासा, म्हणाली, माझ्या काही अटी…
अभिनेत्री श्वेता तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. श्वेता तिवारी सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना श्वेता तिवारी दिसते. आता नुकताच श्वेता तिवारी हिच्याकडून अत्यंत मोठा खुलासा हा करण्यात आलाय.
श्वेता तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. श्वेता तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. विशेष म्हणजे थेट सलमान खान याच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी पलकला मिळाली. श्वेता तिवारी हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. श्वेता तिवारी सोशल मीडियावर सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना श्वेता तिवारी दिसते. मात्र, गेल्या काही वर्षांपापासून श्वेता तिवारी मालिकांपासून दूर आहे.
नुकताच श्वेता तिवारी हिने मोठा खुलासा केलाय. श्वेता तिवारी म्हणाली की, आता टेलिव्हिजन अगोदरप्रमाणे राहिले नाहीये. आता शो बोर होतात. आता खूप कमी शो आहेत, जे बघण्याची इच्छा होते. एक हैराण करणारी गोष्ट म्हणजे नवीन लोक स्वत: ला अभिनेते म्हणून घेतात. मात्र, खूप कमी पैशांमध्ये ते काम करतात. जर मला एखाद्या शोची ऑफर असेल तर मी माझ्या काही मागण्या ठेवते.
सर्वात पहिले म्हणजे मी कमी पैशांमध्ये शो करणार नाही. दुसरे महत्वाचे म्हणजे प्रोडक्शनवाले 30 दिवस काम करून घेतात. अगोदरची गोष्ट वेगळी होती 30 दिवस काम करण्याची आता ते होत नाही. आता मला माझ्या मुलांकडेही लक्ष द्यावे लागते. माझे म्हणणे असते की, 20 दिवस काम करून घ्या आणि मला रविवारी सुट्टी द्या. कारण मला माझ्या लेकरांसोबतही वेळ घालवावा लागतो.
बऱ्याचदा शोचे लोकेशन खूप जास्त दूर असते, त्यामुळेही मी शो करण्यास नकार देते. जर लोकेशन दूर असेल तर मी माझ्या मुलांना कसे पाहणार ना. अगोदर माझी मम्मी घर सांभाळत होती. आता तिचे वय झाले आहे, तिच्याकडेच लक्ष द्यावे लागते. त्यामुळे मी आता टीव्ही शो अजिबात करत नाहीये. रोहित शेट्टीच्या वेब सीरिजमध्ये धमाका करताना श्वेता तिवारी ही दिसली होती.
श्वेता तिवारी हिचे खासगी आयुष्य देखील चर्चेत राहिले आहे. श्वेता तिवारी हिने पतीवर गंभीर आरोपही केले होते. अनेक अभिनेत्यांसोबतही श्वेता तिवारीचे नाव जोडले गेले आहे. श्वेता तिवारी हिने मुलगी पलक तिवारी हिच्या बॉलिवूड पर्दापणासाठी खूप जास्त मेहनत घेतलीये. याबद्दल काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा करताना श्वेता तिवारी ही दिसली आहे.