सोनाक्षी सिन्हा हिने अखेर झहीर इक्बाल याच्यासोबतच्या लग्नाबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली, माझ्या..
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी सात वर्षे डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हा हिने आपल्या लग्नाचे खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही कायमच चर्चेत असते. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा ही मोठ्या संपत्तीची मालकीनही आहे. सोनाक्षी सिन्हा हिने काही दिवसांपूर्वीच झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. लग्न झाल्यापासूच सतत चर्चेत सोनाक्षी आहे. सोनाक्षी सिन्हा हिने सात वर्ष झहीर इक्बाल याला डेट केले आणि त्यानंतर तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा दिसत आहे.
सोनाक्षी सिन्हा हिने आता नुकताच तिच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केलाय. सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, मला आणि झहीरला सुरूवातीपासूनच अशाप्रकारचेच लग्न करायचे होते. लग्नामध्ये जवळचे लोक हवे होते आणि आम्ही तशाच प्रकारचे लग्नही केले. सर्वांनीच आमच्या लग्नात धमाल केली, आम्ही दोघांनीही.
लग्नामध्ये आलेल्या सर्वांनी मनसोक्त आनंद घ्यावा हेच आम्हाला वाटत होते. मला जसे हवे होते तसेच लग्न मी केल्याचे सोनाक्षी सिन्हा हिने म्हटले आहे. सोनाक्षी सिन्हा हिने लग्नानंतर खास पार्टीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार उपस्थित होते. आपल्याच लग्नाच्या पार्टीत सोनाक्षी सिन्हा ही धमाल करताना दिसली.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी आणि झहीर इक्बाल डान्स करताना दिसले. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाचे जवळपास सर्वच कार्यक्रम घरी पार पडले. त्यानंतर त्यांनी सिव्हील मॅरेज केले. यावेळी तिचे आई वडील आणि अजून काही जवळचे लोक उपस्थित होते.
त्यानंतर रात्री मोठ्या पार्टीचे आयोजन करण्यात आले. सोनाक्षी सिन्हा ही हिंदू आणि झहीर इक्बाल हा मुस्लिम असल्याने यांचे लग्न नेमके कोणत्या पद्धतीने होणार याची काही दिवस चर्चा होताना दिसली. लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांना शुभेच्छा देताना अनेकजण दिसले. मात्र, सोनाक्षी सिन्हाच्या लग्नामध्ये तिचे दोन्ही भाई लव आणि कुश हे उपस्थित नव्हते.