Date Bhet | सोनाली कुलकर्णीच्या ‘डेट भेट’मध्ये अभिनेता संतोष जुवेकरची एंट्री, सेटवरून शेअर केले हटके फोटो!

लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘डेट भेट’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या लंडनमध्ये सुरू आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Date Bhet | सोनाली कुलकर्णीच्या ‘डेट भेट’मध्ये अभिनेता संतोष जुवेकरची एंट्री, सेटवरून शेअर केले हटके फोटो!
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 5:06 PM

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वाची ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये पोहोचली आहे. लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘डेट भेट’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या लंडनमध्ये सुरू आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनाली रोज नवीन नवीन फोटो शेअर करून चाहत्यांना थेट लंडनमधून अपडेट देत आहे. आता तिच्या या चित्रपटात मराठी अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) याची एंट्री झाली आहे (Actress Sonalee Kulkarni share’s photo with Santosh Juvekar from set of Date Bhet).

सोनाली कुलकर्णी आणि संतोष जुवेकर दोघांनीही हटके फोटो पोस्ट करत याविषयीची माहिती चाहत्यांना दिली आहे. सोनालीने संतोष जुवेकर सोबतचा एक जबरदस्त स्वॅगवाला फोटो पोस्ट केला आहे. ‘आय लव अॅटम’, असे कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे.

(Actress Sonalee Kulkarni share’s photo with Santosh Juvekar from set of Date Bhet)

फूल टू राडा होणार…

सोनाली प्रमाणेच अभिनेता संतोष जुवेकरने देखील सोनाली सोबतचा फोटो पोस्ट करत झक्कास कॅप्शन दिले आहे. ‘London मधे shooting त्यात आपल्या मराठी सिनेमातली अप्सरा सोनाली आणि मी एकत्र…… दाद्या आता 2021 फुल्लटू राडाचना भाई. She is supperb and beauty with Talent of performance. ? आणि अजून एकजण आहे तो तर स्वतःच राडा बहाद्दूर आहे त्याच्या सोबतचा फोटो पण लवकरच post करेन. पण Always ladies first….. ?क्या करें आदतसे मजबूर ??????… ढोमी Missing u❤❤ आल्यावर बसूच oppss sorry भेटूच ??’, असे हटके कॅप्शन दिले आहे (Actress Sonalee Kulkarni share’s photo with Santosh Juvekar from set of Date Bhet).

(Actress Sonalee Kulkarni share’s photo with Santosh Juvekar from set of Date Bhet)

‘हे’ सरदारजी कोण?

सध्या सोनाली आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये आहे. ‘डेट-भेट’ असं तिच्या या नव्याकोऱ्या चित्रपटाचं नाव आहे. लेखक-अभिनेता हेमंत ढोमेसह ती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नावाप्रमाणेच हटके असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन लोकेश गुप्ते हे करणार असून असून अमेय खोपकर, स्वाती खोपकर निर्माता आहेत. लंडनमधल्या या चित्रपटाच्याच्या सेटवरुन अनेक फोटो सोनाली चाहत्यांशी शेअर करते. याआधी सोनालीने अभिनेते-दिग्दर्शक लोकेश गुप्ते यांच्यासह हटके लुकमधले सुंदर फोटो पोस्ट केले होते.

(Actress Sonalee Kulkarni share’s photo with Santosh Juvekar from set of Date Bhet)

मनोरंजन विश्व पूर्वपदावर…

लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेकांच्या कामाला ब्रेक लागला होता. मध्ये बराच काळ गेल्यानंतर आता अनलॉकच्या प्रक्रियेत सारं काही हळूहळू सुरू होतंय. मनोरंजनसृष्टीमध्येही कामाला सुरुवात झाली आहे. मालिकांचं रोजचं चित्रीकरण सुरू झालंय. त्याबरोबरच चित्रपटांच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. त्यात मराठी चित्रपटही मागे नाहीत. बऱ्याच मराठी चित्रपटांचं चित्रीकरण आता परदेशात होतं आहे.

(Actress Sonalee Kulkarni share’s photo with Santosh Juvekar from set of Date Bhet)

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.