Taali | ‘ताली तो अब बजेगी, मेरे हात से और इनके…’, ‘ताली’ सीरिजमधील काही थक्क करणारे सीन
'आर्या' सीरिजनंतर अभिनेत्री सुष्मिताने सेन हिने 'ताली'मधून अनेकांवर साधला निशाणा; सीरिजमधील 'हे' सीन पाहिल्या व्हाल हैराण... सध्या सर्वत्र अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्या 'ताली' सीरिजची चर्चा...
मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री सुष्मिता सेन हिने बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील स्वतःच्या वेगळं राज्य स्थापन केलं आहे. १५ ऑगस्ट रोजी सुष्मिता सेन स्टारर ‘ताली’ सीरिज प्रदर्शित झाली. सध्या सर्वत्र ताली सीरिजची चर्चा रंगत आहे. ट्विटरवर सध्या सीरिजमधील काही सीन तुफान व्हायरल होत आहेत. प्रेक्षकांना ‘ताली’ सीरिज प्रचंड आवडत आहे. ‘ताली’ सीरिजच्या माध्यमातून स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या श्रीगौरी सावंत यांचा खडतर प्रवास प्रेक्षकांसमोर आला आहे. श्रीगौरी सावंत यांनी स्वतःच्या आणि ट्रान्सजेंडरच्या हक्कांसाठी पुढाकार घेतला. श्रीगौरी सावंत देखील कायम त्यांच्या कार्यामुळे चर्चेत असतात.
ट्विटरवर सीरिजमधील एक सीन पोस्ट करत कॅप्शनमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत. ‘सुष्मिता सेन हिचा अभिनय कायम मंत्रमुग्ध करणारा राहिला आहे. तिने ही भूमिका साकारण्यासाठी होकार दिला म्हणून मी आनंदी आहे… सीरिजच्या माध्यामातून तिने सत्य समोर आलं आहे..’ सिनेमातील हा सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
The acting of #susmitasen is always mesmerising to watch . But this scene and her acting literally gave me goosebumps . I m glad she accepted the character and put forward every angle of it . @JioCinema #Taali pic.twitter.com/rEbMZLCicj
— Jeet (@mysters_oldsoul) August 15, 2023
एका सोशल मीडियावर युजरने सीरिजमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. अत्यंत धक्कादायक आहे. सीनमध्ये सुष्मिता (गौरी सावंत) हिच्या एका मैत्रीणीचं निधन होतं. तेव्हा मैत्रीणीचा मृतदेह जमिनीवर ठेवल्यामुळे रागलेली सुष्मिता दिसत आहे.. सीरिजमधील हा सीन देखील अत्यंत धक्कादायक आहे.
Is Sushmita Sen one of the greatest artists of her generation?
The answer is YES. YES. YES.
Please see this clip @thesushmitasen #TaaliOnJioCinema, streaming free 15 Aug onwards.@jiocinema @ShreegauriS#Taali #JioCinema ❤️
Created by @arjunsbaran @Kartikgseams Directed… pic.twitter.com/e3ICt4is92
— Vikas Khanna (@TheVikasKhanna) August 16, 2023
संबंधतील व्हिडीओ पोस्ट सोशल मीडिया युजरने कॅप्शनमध्ये, ‘सुष्मिता सेन तिच्या पिढीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे का? तर उत्तर असेल- हो हो हो…. सध्या सर्वत्र सुष्मिता सेन स्टारर ‘ताली’ सीरिजची चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर सीरिजचे अनेक फोटो आणि सीन व्हायरल होत आहेत…
Sushmita Sen has done justice to this character very well and has surpassed all the limits of acting. Outstanding @thesushmitasen#SushmitaSen #Taali pic.twitter.com/ydJVtscLcb
— SanghamitraTyagi (@_vampire_st_) August 15, 2023
सीरिजचं टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक १५ ऑगस्टच्या प्रतीक्षेत होते. सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर सुष्मिता हिचा दमदार अभिनय प्रेक्षकांना आवडत आहे. ‘ताली’ वेब सीरिज प्रेक्षकांना जीओ सिनेमावर पाहता येणार आहे.