‘पैसे कमवायचे आहेत म्हणून…’, ललित मोदीसोबत खरंच लग्न करणार होती सुष्मिता सेन? अभिनेत्री अखेर व्यक्त झालीच
Sushmita Sen : सुष्मिता सेन हिला करायचं होतं 59 वर्षीय ललित मोदी याच्यासोबत लग्न? एक वर्षानंतर अभिनेत्रीने सोडलं मौन... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या नात्याची चर्चा... फोटोंमुळे उडाली होती सर्वत्र खळबळ
मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : गेल्या वर्षी अभिनेत्री सुष्मिता सेन आणि उद्योजक ललित मोदी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी खळबळ माजली होती. सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त ललित आणि सुष्मिता यांच्या खासगी फोटोंची चर्चा होती. दोघांनी लग्न केल्याची चर्चा देखील सर्वत्र रंगली होती. सांगायचं झालं तर, ललित मोदी याने सुष्मिता हिच्यासोबत काही खासगी फोटो पोस्ट केले होते. फोटो पोस्ट करत ललित याने रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा केली होती. एवढंच नाही तर, अभिनेत्रीला ‘गोल्ड डिगर’ देखील अनेक जण म्हणाले होते. पण आता एक वर्षानंतर सुष्मिता हिने ललित मोदी याच्यासोबत असलेल्या नात्यावर मौन सोडलं आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत सुष्मिता सेन म्हणाली, ‘झालेली घटना माझ्या आयुष्यातील एक फेज होता. तेव्हा अनेक मीम्सपण व्हायरल झाले होते. ते मीम्स मला आवडले होते. पण कोणाला गोल्ड डिगर म्हणून त्या माध्यमातून पैसे कमावू नका.. सत्य नक्की काय आहे याचा शोध घ्या…’
‘मला सोनं नाही तर, हिरे आवडतात. जर मला कोणासोबत लग्न करायचं असतं, तर मी केव्हाच केलं असतं. त्यासाठी प्रयत्न केले नसते…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुष्मिता हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. ललित मोदी याच्याआधी देखील सुष्मिता हिने अनेक सेलिब्रिटींना डेट केलं आहे.
सध्या सुष्मिता बॉयफ्रेंड रोहमान शॉल याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. सुष्मिता बॉयफ्रेंडसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकताच झालेल्या दिवाळी पार्टीमध्ये देखील दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं.
सुष्मिता हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, सुष्मिता सध्या ‘आर्य 3’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ‘आर्या’ सीरिजचे पहिले दोन सीझन देखील चाहत्यांना प्रचंड आवडले होते. आता ‘आर्य 3’ला देखील प्रेक्षक प्रेम देताना दिसत आहेत. सध्या सुष्मिता ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर देखील सुष्मिता कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम दोन मुलींसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.