मुंबई : उर्फी जावेद हे नेहमीच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही कधी काय घालेल याचा अजिबात अंदाजा बांधला जाणू शकत नाही. उर्फी जावेद हिने टीव्ही मालिकांपासून आपल्या करिअरची सुरूवात केलीये. विशेष म्हणजे अनेक हिट मालिकांमध्ये तिने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. बरीच वर्षे उर्फी जावेद ही ऐ रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत होती. तिने अनेक मालिकांमध्ये हिट भूमिका केल्या. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून (Bigg Boss OTT) मिळाली. उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही सोशल मीडियावर बघायला मिळते. नेहमीच उर्फी तिच्या कपड्यांमुळे वादात अडकते.
उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे नेहमीच थेट जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जातात. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशमध्ये काही महिला या उर्फी जावेद हिच्या कपड्यांच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरल्या होत्या. या महिलांना रस्त्यावर येत आंदोलन देखील केले होते. उर्फी जावेद हिला तिच्या अतरंगी कपड्यांमुळे खास ओळख मिळालीये.
उर्फी जावेद हिने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने चक्क पिझ्झाची बिकिनी तयार केली आहे. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. उर्फी जावेद हिने चक्क पिझ्झाचे स्लाइस बिकिनी म्हणून वापरले आहेत. उर्फी जावेद ही या व्हिडीओमध्ये चक्क पिझ्झा खाताना देखील दिसत आहे.
उर्फी जावेद हिचा हा लूक आणि व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. आता उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत उर्फी जावेद हिला टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे. उर्फी जावेद हिला अनेक सल्ले देताना लोक दिसत आहेत. अनेकांनी अन्नाला तरी सोड देखील उर्फीला म्हटले.
उर्फी जावेद हिचा हा लूक काही लोकांना आवडला देखील आहे. एकाने कमेंट करत म्हटले की, अशा आयडिया उर्फी जावेद हिच्याकडे कुठून येतात हेच मला कळत नाही. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने बिकिनीवरील फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते. उर्फी जावेद हिचे हे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसला होता. ईदच्या दिवशी बिकिनीवरील फोटो शेअर केल्याने उर्फी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती.