प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या कारने 2 मेट्रो मजुरांना उडवलं; एकाचा मृत्यू, अभिनेत्रीही गंभीर जखमी
एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या कारने दोन मेट्रो कामगारांना उडवलं आहे. यात एकाचा मृत्यू झालाय तर अपघातात अभिनेत्रीही गंभीर जखमी असल्याचे बोलले जात आहे. ही अभिनेत्री सुप्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते अन् अभिनेत्याची सून आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे हिच्या कारचां भीषण अपघात झाला आहे. तिच्या करने दोघांना उडवलं असून त्यात एकाच मृत्यू झाल्याचं सोमर येत आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे.मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली.
उर्मिला कोठारेच्या कारचा भिषण अपघात
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भिषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उर्मिला सकाळी कामावरून घरी परत असताना हा अपघात झाला. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. या घटनेत तिच्या कारने दोन मजुरांना धडक दिली असून यात एकाचा मृत्यू झालाय. तर अभिनेत्री उर्मिला कोठारे देखील गंभीर जखमी झाली आहे.
मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना तिच्या भरधाव कारने धडक दिली, या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. ही कार मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेची असल्याचीच माहिती समोर आली आहे.
त्याचप्रमाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री उर्मिला काल रात्री तिचे शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती. कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोघांना धडक दिली.
View this post on Instagram
उर्मिलाच्या कारने 2 मेट्रो कामगारांना उडवले, एकाचा मृत्यू
ज्या मजूरांना उर्मिलाच्या कारने उडवलं ते दोन्ही मजूर हे मेट्रोमध्ये काम करणारे होते, अशी माहिती समोर आलेली आहे. या अपघातात एका मजूराचा मृत्यू झालाय. तर, एकजण गंभीर जखमी असल्याचं समजतंय. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत असून. मुंबईतील समतानगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
अपघातात अभिनेत्रीही जखमी
उर्मिलाही या अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या अपघातातमध्ये उर्मिलाला कितपत दुखापत झाली आहे याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या अपघाताचे स्वरुप पाहता हा अपघात गंभीर असल्याचे लक्षात येत आहे.
उर्मिला कोठारे ही नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेतून तब्बल 12 वर्षांनी उर्मिलाने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. दिग्दर्शक आणि अभिनेता आदिनाथ कोठारेची ती पत्नी असून निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची ती सून आहे. पण या अपघाताच्या घचनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.