विद्या बालन प्रेग्नंट? थेट मोठा खुलासा, अभिनेत्रीने अखेर…
बाॅलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही कायमच चर्चेत असते. विद्या बालन हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विद्या बालन हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. विद्या बालन ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही कायमच चर्चेत असते. विद्या बालन हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विद्या बालन हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. विद्या बालन ही सोशल मीडियावर तूफान चर्चेत असते. कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना विद्या बालन ही दिसते. काही दिवसांपूर्वीच विद्या बालन हिने एक अत्यंत खास व्हिडीओ शेअर केला होता. ज्यानंतर तो व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला. अनुपमा मालिकेच्या डाॅयलाॅगवर तिने हा व्हिडीओ तयार केला होता.
सध्या विद्या बालन हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. या पोस्टमुळे विद्या बालन ही तूफान चर्चेत आलीये. विद्या बालन हिने शेअर केलेली ही पोस्ट पाहून अनेक चर्चा सुरू झाल्या. ही पोस्ट पाहून अंदाजा लावला जातोय की, विद्या बालन ही प्रेग्नंट आहे आणि तिच्या पहिल्या बाळाला ती लवकरच जन्म देईल.
इंस्टाग्राम स्टोरीवर ‘दो और दो प्यार’ अशी पोस्ट विद्या बालन हिने शेअर केली. या पोस्टनंतरच चर्चा सुरू झाली की, विद्या बालन ही प्रेग्नंट आहे. इतकेच नाही तर चाहते हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विद्या बालन हिला शुभेच्छा देताना दिसले. विद्या बालन ही प्रेग्नंट असल्याची चर्चा सतत रंगताना दिसली.
आता विद्या बालन हिच्या प्रेग्नंसीबद्दल मोठा खुलासा करण्यात आलाय. विद्या बालन ही प्रेग्नंट नसून विद्या बालन हिच्या आगामी चित्रपटाचे नाव हे ‘दो और दो प्यार’ आहे. याच चित्रपटाचे प्रमोशन करताना विद्या बालन ही दिसलीये. विद्या बालन ही कायमच चर्चेत असते. बिनधास्त स्वभावासाठी देखील विद्या बालन हिला ओळखले जाते.
काही दिवसांपूर्वीच विद्या बालन हिने मोठा खुलासा करत थेट म्हटले होते की, एका डायरेक्टरने मला थेट हाॅटेल रूममध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. मला मुळात एका चित्रपटासाठी त्याला भेटायचे होते. मी त्यांना अगोदरच म्हटले होते की, आपण कॉफी शॉपमध्ये भेटूयात. पण त्याला हाॅटेल रूमममध्ये भेटायचे होते. मी थोडक्यात कास्टिंग काउचचा शिकार होताना वाचले.