‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात, ‘अदा का स्वयंवर’ नक्की काय आहे सत्य?

Adah Sharma | ‘अदा का स्वयंवर’ खरंच अदा शर्मा अडकणार विवाबबंधनात? कोण आहे अभिनेत्रीचा होणार पती, काय आहे रहस्य? एका सोशल मीडियापोस्टमुळे चर्चांना उधाण... फोटो पाहून तुम्हाला देखील होईल आश्चर्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अदा शर्मा हिची चर्चा...

'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात, ‘अदा का स्वयंवर’ नक्की काय आहे सत्य?
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 11:12 AM

मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री अदा शर्मा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेत्रीला ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. आज अदा शर्मा हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकरल्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. चाहते आजही अदा हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. पण आता अदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अदा शर्मा हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

इंन्स्टाग्रामवर अदा शर्मा हिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अदा अनेक बंदूक घेत निशाणा साधताना दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘अदा का स्वयंवर’ असं लिहिलं आहे. कॅप्शनमुळे अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. शिवाय ‘योग्य व्यक्ती नाही तर, योग्य बंदूक निवडत आहे..’ असं देखील अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

अदा शर्मा हिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अदा लवकरच आगामी प्रोजेक्टची घोषणा करणार आहेत. त्यामुळे अदा आगामी सीरिजची कधी घोषणा करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अदा शर्मा हिचे आगामी सिनेमे

अदा शर्मा सध्या दिग्दर्शक सुदीप्तो सेन और निर्माता विपूल अमृतलाल शाह यांच्यासोबत ‘बस्तर’ सिनेमाची शुटिंग करत आहे. अदा शर्मा कायम नव्या भूमितेतून चाहत्यांच्या समोर येत आहे. आता ‘बस्तर’ सिनेमात अभिनेत्री कोणत्या भूमिकेत दिसेली… यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘बस्तर’ सिनेमा सत्य घटनेवर आधारलेला असणार आहे.

सांगायचं झालं तर, सत्य घटनेवर आधारित ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा प. बंगाल आणि तमिळनाडू याठिकाणी बॅन करण्यात आला होता. तरी देखील सिनेमाने 200 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. महत्त्वाचं म्हणजे सिनेमा फक्त 15 ते 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.