मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ‘द केरळ स्टोरी’ यंद्याच्या वर्षातील उत्तम सिनेमांपैकी एक ठरला आहे.. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने मोठी मजल मारली आहे. सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला असला तरी, प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात मोठी करताना दिसत आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची चित्रपटगृहात मोठी गर्दी जमत आहे. सिनेमाने आतापर्यंत तब्बल १५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.. अनेकांनी सिनेमा चित्रपटगृहात जावून पाहिला आहे… तर अनेकांनी अद्यापही सिनेमा पाहिलेला नाही. ज्यांनी सिनेमा पाहिलेला नाही त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण प्रेक्षकांना आता सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे. सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
सध्या चर्चेत असलेल्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची ओटीटी रिलीज डेट, बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि अन्य गोष्टी देखील जाणून घेवू.. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. अनेक ठिकाणी सिनेमाला विरोध करण्यात आला, तर अनेक ठिकाणी ‘द केरळ स्टोरी’ सिनेमावर बहिष्कार टाकण्यात आला..
ZEE5 has reportedly bought the rights to #TheKeralaStory. Know when it can stream online.https://t.co/RKfbwa9zdA
— mysmartprice (@mysmartprice) May 9, 2023
५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाला प्रदर्शित होवून दोन आठवडे झाले आहेत. दोन आठवड्यात सिनेमाने बॉक्स ऑफिस आणि चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे… सिनेमावरून सुरु असलेला वाद अद्याप शमलेला नाही…. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाबद्दल रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत.. अशात सिनेमाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे…
बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणारा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे… मेकर्स सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाले आहेत… मिळालेल्या माहितीनुसार, झी नेटवर्कने ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचे स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले आहेत, त्यामुळे सिनेमा झी 5 वर प्रदर्शित होईल. निर्माते ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा ७ जुलै रोजी प्रदर्शित करू शकतात. मात्र, ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या निर्मात्यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री अदा शर्मा हिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे.