The Kerala Story सिनेमाच्या कमाईला ब्रेक; 14 व्या दिवशी कमावले इतकेच रुपये
The Kerala Story सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे फिरवली पाठ; अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी' सिनेमाच्या कमाईला ब्रेक..., सिनेमाने कमावले इतके कोटी...
मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने चाहच्यांच्या मनात घर केलं आहे. फार कमी दिवसांत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. पण आता ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाला ब्रेक लागला आहे. सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात चाहत्यांची गर्दी पाहायला मिळत होती. पण आता सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. सिनेमाने आतापर्यंत १५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमा २०० कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल अशी अपेक्षा निर्मात्यांकडून वर्तवण्यात येत आहे. २०२३ मधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्यांपैकी ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा दुसरा सिनेमा ठरला आहे. पण ‘द केरळ स्टोरी’ सिनेमच्या कमाईला ब्रेक लागला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर १४ दिवशी सिनेमाने सर्वात कमी कमाई केली आहे…
‘द केरळ स्टोरी’ सिनेमाता बोलबाला आता कमी होताना दिसत आहे. पहिल्या आठवड्यात सिनेमाने दमदार कमाई केली. पण आता सिनेमाची कमाई कमी होताना दिसत आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या १४ व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. १४ व्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी घट झालेली दिसून येत आहे..
रिपोर्टनुसार, ‘द करेळ स्टोरी’ सिनेमाने गुरुवारी म्हणजे १४ व्या दिवशी फक्त ६.५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमाने आतापर्यंत १७१. ०९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्याचा शनिवार – रविवार सिनेमासाठी लाभदायक ठरतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे, फक्त ३० कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या सिनेमाने १७१.०९ कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा २०२३ मधील दुसरा सुपरहीट सिनेमा ठरला आहे. अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने सलमान खान याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ आणि रणबीर कपूर याच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाचा देखील रेकॉर्ड मोडला आहे..
अनेक वादांमळे अडचणीत अडकलेला ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा एक नवीन इतिहास रचताना दिसत आहे… बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणारा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे… मेकर्स सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाले आहेत…
मिळालेल्या माहितीनुसार, झी नेटवर्कने ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचे स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले आहेत, त्यामुळे सिनेमा झी 5 वर प्रदर्शित होईल. निर्माते ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा ७ जुलै रोजी प्रदर्शित करू शकतात. मात्र, ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या निर्मात्यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.