The Kerala Story फेम अदा शर्मा हिची मोठी घोषणा; इतक्या कमी किंमतीत पाहता येणार सिनेमा

'द केरळ स्टोरी' सिनेमा आतापर्यंत पाहिला नसेल तर, तुमच्यासाठी 'बेस्ट ऑफर', अदा शर्माने केली मोठी घोषणा..., सध्या सर्वत्र अदा शर्मा फेम 'द केरळ स्टोरी' सिनेमाची चर्चा...

The Kerala Story फेम  अदा शर्मा हिची मोठी घोषणा; इतक्या कमी किंमतीत पाहता येणार सिनेमा
The Kerala Story
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 10:00 AM

मुंबई | अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ‘द केरळ स्टोरी’ यंद्याच्या वर्षातील उत्तम सिनेमांपैकी एक ठरला आहे.. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने मोठी मजल मारली आहे. सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला असला तरी, प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात मोठी करताना दिसत आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची चित्रपटगृहात मोठी गर्दी जमत आहे. सिनेमाने आतापर्यंत तब्बल २९२ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमा प्रदर्शित होवून पाच आठवडे झाले आहेत. तरी देखील सिनेमाचा चाहत्यांमध्ये असणारा बोलबाला कमी झालेला नाही. अनेक चाहते एक नाही तर दोन तीन वेळा चित्रपटगृहात जावून सिनेमा पाहत आहेत. पण अद्यापही अनेकांनी सिनेमा पाहिलेला नाही.

ज्यांनी सिनेमा पाहिलेला नाही किंवा ज्या चाहत्यांना पुन्हा सिनेमा पाहायचा आहे, त्यांना आता फार कमी किंमतीत सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा आतापर्यंत पाहिला नसेल तर, तुमच्यासाठी ‘बेस्ट ऑफर’ सिनेमाच्या टीमने आणली आहे. अदा शर्मा हिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा आता चाहत्यांना फक्त आणि फक्त ९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहे. अशी घोषणा खुद्द अदा शर्मा हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे या ऑफरच्या सिनेमाला किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिग्दर्शक सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने पहिल्या आठवड्यात ८१.१४ कोटी रुपये कमावले होते.

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा यंद्याच्या वर्षातील दुसरा सुपरहीट सिनेमा ठरला आहे. सिनेमाने भारतात २३७.६२ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर जगभरात सिनेमाने तब्बल २९२.५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. अशात तिकिट ९९ रुपये केल्यानंतर सिनेमाला किती फायदा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र ‘द केरळ’ स्टोरी सिनेमाची चर्चा रंगत आहे.

नक्की काय आहे ‘द केरळ स्टोरी’ ?

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा त्या अहवालांवर आधारित आहे ज्यानुसार केरळमधील सुमारे ३२ हजार महिलांना बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यात आलं आणि अनेकांना ISIS अंतर्गत सीरियात नेण्यात आलं. सिनेमाचे निर्माते म्हणतात की हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे आणि त्यामुळे तो अनेक वादांनी घेरला आहे…. सध्या सर्वत्र ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.