Video | शिवजयंतीला सर्वाधिक गाणं कोणतं वाजतंय? आदर्श शिंदेचं गाणं लाखोंनी बघितलं, तुम्ही पाहिलं?
गायक आदर्श शिंदे याने ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या जयंती निमित्ताने एक खास गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे.
मुंबई : ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही…’ या गाण्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायक आदर्श शिंदे याने ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या जयंती निमित्ताने एक खास गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. ‘माझ्या राजाचं राजंपण काल होतं, आज-उदय राहणारं!’, असे या गाण्याचे बोल असून, हे गाणे सध्या प्रचंड चर्चेत आहे (Adarsh Shinde new song Rajacha Rajpan trending).
दरवर्षी शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या उत्साहावर काहीशी बंधने आली आहेत. यंदाच्या वर्षी सर्व शिवप्रेमींना घरातूनच महाराजांचे स्मरण करण्याचे आवाहन केले गेले आहे. आजच्या दिवशी घराघरातून शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. अशावेळी आदर्शच हे गाणं घराघरांत आणि रसिकांच्या मनात प्रचंड गाजतं आहे.
तुम्हीही ‘हे’ गाणं ऐकाच!
गाण्याची सुरुवात शिवगर्जनेने होते. ‘सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणारं, माझ्या राजाचं राजंपण काल होतं, आज-उदय राहणारं!’, असे या गाण्याचे बोल असून, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या काळजाला भिडणारं हे गाणं सध्या खूप चर्चेत आहे. शिवजयंती विशेष हे गाणं उत्कर्ष आणि आदर्श शिंदे यांनीच लिहिले असून, त्यांनीच या गाण्याचे संगीत आणि निर्मितीची बाजूही सांभाळली आहे. आतापर्यंत जवळपास साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी पहिले आहे. युट्युबवर हे गाणं सध्या गाजत असून, प्रचंड लाईक्स मिळत आहे.
(Adarsh Shinde new song Rajacha Rajpan trending).
आदर्शची कारकीर्द
7 मार्च 1988 रोज जन्मलेल्या आदर्श याला गाण्याचे प्राथमिक शिक्षण वडिलांकडूनच मिळाले. आनंद शिंदे यांनी मुलाचे पाय पाळण्यातच ओळखले आणि त्याच्यातील शिंदेंच्या गायकीचा वारसा चालवण्याचे अंगभूत गुण हेरून त्याला शास्त्रीय गायकीचे रितसर शिक्षण सुरु केले. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याकडूनही आदर्शने शास्त्रीय गायनाचे धडे घेतले (Adarsh Shinde’s new song Rajacha Rajpan trending).
शालेय जीवनात पहिले रेकॉर्डिंग
आदर्श आणि उत्कर्ष या बंधूंना गोड गळा असल्यामुळे लहानपणापासून वडिलांसोबत महाराष्ट्रभर गाण्याची संधी मिळाली. बालवयापासूनच त्यांनी रेकॉर्डिंगही सुरु केले होते. आदर्शचा भाऊ उत्कर्षने ‘दिव्य मराठी डॉट कॉम’सोबत बोलताना सांगितले की, आम्ही दोघांनी वडिलांकडूनच गाणे शिकले. आदर्श आणि उत्कर्ष यांचे पहिले रेकॉर्डिंग देखील सोबतच झाले होते. आदर्श सातवीत असताना त्याने ‘सपना’ या अल्बमसाठी पहिले गाणे गायले. त्याने मराठीसह सुनिधी चौहान, शाल्मली खोलगडेसोबत आणि अनेक हिंदी गायकांसोबत पार्श्वगायन केले आहे.
गाण्यांची जादू
आदर्शच्या आवाजाला असलेला बेस ही त्याला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे. वडील आनंद शिंदे आणि आजोबा प्रल्हाद शिंदे यांच्यातील गायकी त्याच्या नसानसात भिनलेले आहे. त्याच बरोबर आजच्या संगीताची अचूक नस त्याने पकडल्यामुळे ‘नारबाच्या वाडी’तील ‘गझाल खरी काय’ असेल नाही तर, ‘असा मी अशी तू’ मधील ‘जीव एकटा’ हे गाणे त्याच्या आवाजातील जादू सांगण्यासाठी पुरेसे आहे.
(Adarsh Shinde’s new song Rajacha Rajpan trending)
हेही वाचा :
1962 The War In The Hills Official Trailer : सैराटफेम परशाच्या जबरदस्त वेब सीरिजचा टीझर VIDEO
Video : ‘पाळणा बाळ शिवाजीचा’, पाहा शालूचा मराठमोळा अवतार
स्टार प्रवाहवरील ‘स्वाभिमान’ मालिकेतून आसावरी जोशी मराठी टेलिव्हिजनमध्ये कमबॅक करणार!https://t.co/VeaPPZYFS9 #asavarijoshi | #swabhiman | #marathitelevision |
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 18, 2021