राखी सावंत हिचं वैवाहिक आयुष्य धोक्यात? आदिल खानची एक्स – गर्लफ्रेंड अखेर म्हणाली…
राखी सावंत हिच्या वैवाहिक आयुष्यात मोठं वादळ... आदिल खान यांच्यावर अनेक गंभीर आरोप आणि पतीच्या एक्स - गर्लफ्रेंडबद्दल राखीचं मोठं वक्तव्य... आता राखी आणि आदिल यांच्या वादात एक्स - गर्लफ्रेंडची उडी
Rakhi Sawant Adil Khan Controversy : बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत हिचं वैवाहिक आयुष्य धोक्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी राखी सावंत हिने पती आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) याच्यावर मारहाण, फसवणूक आणि अश्लील व्हिडीओ शूट करून विकल्याचे आरोप केले होते. राखीने आदिल विरोधात पोलिसांत तक्रार केल्यानंतर आदीलला पोलिसांनी अटक केली आहे. आता आदिल खान याची गर्लफ्रेंड रोशिना देलेवारी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आदिल आणि तिच्यामध्ये असलेल्या नात्याचा खुलासा केला आहे. सध्या रोशिना देलेवारी हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रोशिना देलेवारी हिने लिहिलं ‘मी कल्पना देखील करू शकत नाही, एक महिला एवढं खोटं कशी बोलू शकते. ती प्रसिद्धीसाठी असं करत आहे का? आदिल याचं लग्न झाल्याचं कळाल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला. राखी आणि आदिल यांच्या नात्याबद्दल माहिती झाल्यानंतर मी उत्साही होती. त्यामुळे भारतीयांनी या प्रकरणात माल ओढण्याचा प्रयत्न करू नका. कारण याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून मला मेसेज येत आहेत.’
पुढे रोशिना देलेवारी म्हणते, ‘राखी सावंत आणि आदिल यांच्यात जे काही वाद सुरु आहेत त्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाही. माझा तुमच्या दोघांशी काहीही संबंध नाही. मी देश सोडत आहे. कृपा करुन मला माझं आयुष्य जगू द्या..’ असं देखील रोशिना देलेवारी पोस्ट मध्ये म्हटली आहे.
सांगायचं झालं तर राखी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता राखी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मारहाण आणि फसवणूक आणि अश्लील व्हिडीओ बनवून विकल्याचे गंभीर आरोप देखील राखीने आदिल याच्यावर केले आहेत. त्यामुळे आदिल खान याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
एवढंच नाही तर, राखीने अनेक पुरावे देखील पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. याप्रकरणी राखी हिचे वकील म्हणाले, ‘आमच्याकडे सबळ पुरावे आहेत. ज्यामुळे आदिल याला जामिन मिळणार आहे. १.५ कोटी रुपयांची फसवणूक प्रचंड मोठा गुन्हा आहे…’ वकिलांच्या वक्तव्यानंतर याप्रकरणी काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Rakhi Sawant lifestyle)
राखी सावंत सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पण नेहमी राखी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. नुकताच अभिनेत्रीने तिच्या आईच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत दिली.