राखी सावंतच्या आईच्या निधनादिवशी नेमकं काय घडलं? आदिल खानकडून धक्कादायक खुलासा

इतकंच नव्हे तर राखीने ड्रग्ज देऊन माझा न्यूड व्हिडीओ शूट केला, असा धक्कादायक आरोपसुद्धा आदिलने केला आहे. आईच्या निधनाबद्दल राखीने आदिलवर काही आरोप केले होते. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना आईच्या निधनानंतर राखीने काय केलं, त्याचा खुलासा केला आहे.

राखी सावंतच्या आईच्या निधनादिवशी नेमकं काय घडलं? आदिल खानकडून धक्कादायक खुलासा
Rakhi Sawant and Adil KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 10:51 AM

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री राखी सावंतचा पती आदिल खानने तुरुंगातून बाहेर येताच तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आदिलने तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने राखीविषयी काही धक्कादायक खुलासे केले. राखीने तिचा पहिला पती रितेशला अद्याप घटस्फोट दिला नसल्याचंही त्याने सांगितलं आहे. पहिल्या पतीला घटस्फोट न देताच राखीने माझ्याशी लग्न केलं, असं तो म्हणाला. इतकंच नव्हे तर राखीने ड्रग्ज देऊन माझा न्यूड व्हिडीओ शूट केला, असा धक्कादायक आरोपसुद्धा आदिलने केला आहे. आईच्या निधनाबद्दल राखीने आदिलवर काही आरोप केले होते. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना आईच्या निधनानंतर राखीने काय केलं, त्याचा खुलासा केला आहे.

“आईच्या निधनाच्या दिवशी राखी बिर्याणी खात होती”

बॉलिवूड बबल या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आदिल म्हणाला, “ज्या दिवशी राखीच्या आईचं निधन झालं होतं, तेव्हापासून मला जाणवू लागलं की ती किती पातळी किती खालावली आहे. आईच्या निधनाच्या दिवशी ती बिर्याणी खात होती. चिली चिकन, मटण बिर्याणी आणि प्रॉन्स कबाब यांचा आस्वाद घेत होती. तिच्यासाठी काहीच महत्त्वाचं नव्हतं. मी जेव्हा तिला अंत्यसंस्काराविषयी विचारलं तेव्हा ती म्हणाली की, तुला जसं करायचं आहे तसं कर.”

“राखीवर खर्च केले लाखो रुपये”

“मी राखीवर लाखो रुपये खर्च केले. तिच्यासोबत नेहमी चांगला वेळ घालवण्याचा प्रयत्न केला. तिला ब्रँडेड कपडे घेऊन दिले आणि दुबईच्या मॉलमध्ये शॉपिंग करून दिली. राखी स्वत: मीडियासमोर म्हणायची की आदिल माझे कपडे डिझाइन करतो. मी तिला लाखोंच्या किंमतीचे ब्रँडेड कपडे घेऊन दिले आहेत. हे सर्व मी माझी पत्नी राखीसाठी केलं होतं. तर मग मी चुकीचा कसा ठरलो”, असा सवाल आदिलने केला.

हे सुद्धा वाचा

राखी सावंतने आदिलवर एक कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर आदिल म्हणाला, “राखीकडे हे आरोप सिद्ध करण्यासाठी काही पुरावे आहेत का? माझ्याकडे तिच्याविरोधात सर्व पुरावे आहेत. मी तिला डायमंडचा नेकलेस दिला होता, बीएमडब्ल्यू कार आणि कोट्यवधींचं घर दिलं आहे आणि त्या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत.”

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.