‘मी बाहेर आल्यानंतर…’, तुरुंगात असलेल्या आदिल खान याने राखी सावंतला दिली धमकी

राखी सावंत हिने गंभीर आरोप केल्यानंतर आदिल खान याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ... आता थेट तुरुंगातून आदिल याने पत्नी राखी हिला दिला धमकी... याप्रकरणी आता पुढे काय होणार?

'मी बाहेर आल्यानंतर...', तुरुंगात असलेल्या आदिल खान याने राखी सावंतला दिली धमकी
Adil Khan Durrani and Rakhi SawantImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 10:21 AM

Adil Khan Durrani Threatens Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. (Rakhi Sawant life) काही दिवसांपूर्वी आदिल खान (Adil Khan Durrani) याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करणारी राखी हिने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी राखी सतत पोलीस आणि न्यायालयात धाव घेत आहे. पती आदिल खान याला जामिन न मिळावा म्हणून राखी पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राखीने आदिलवर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. आदिलला सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. २० फेब्रुवारी २०२३ रोजी राखी आदलला भेटायला गेली होती, तेव्हा आदिलने आपल्याला धमकी दिल्याचं राखीने सांगितलं आहे.

सोमवारी आदिल प्रकरणी सुनावणी झाली. त्यानंतर राखीने माध्यमांसोबत संवाद साधला. राखी म्हणाली, ‘आदिल मला म्हणाला यापेक्षा वाईट आणखी काय असू शकतं. मी आर्थर रोड तुरुंगात गेलो. याठिकाणी मला भांडी घासावी लागत आहेत. लोकांचे पाय दाबावे लागत आहेत. आर्थर रोड तुरुंगात प्रचंड मारतात. यापेक्षा माझ्यासोबत आणखी वाईट काय असू शकतं. मी बाहेर आल्यानंतर, तुझं काय होईल…’ (rakhi sawant news)

पुढे राखी रडत म्हणाली, ‘मी आदिलला सांगितलं यापेक्षा माझं काय वाईट होवू शकतं. असं मी जगत असले तरी मृत आहे. मी जेवत नाही.. लग्नानंतर आदिल त्या इराणी मुलीला स्वतःचा प्रेम असल्याचं सांगत होता. राखीकडून पैसे घेतल्यानंतर तिला सोडून देईल असा त्याचा प्लॅन होता. लग्न झालं म्हणून मी आनंदी होती. पती आहे आणि आता बाळ देखील होईल…’ असं राखी म्हणाली.

आदिल आणि राखी यांनी मे २०२२ मध्ये लग्न केलं. आदिल म्हैसूर याठिकाणी राहतो. गेल्या काही दिवसांपासून राखी आदिलवर गंभीर आरोप करताना दिसत आहे. फसवणूक, मारहाण आणि अश्लील व्हिडीओ विकल्याचे आरोप राखी हिने आदिल याच्यावर केले आहेत. शिवाय अन्य कारणांमुळे देखील आदिल वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. (rakhi sawant first husband)

राखी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी राखीच्या आईचं निधन झालं. तेव्हा आईच्य निधनाची बातमी राखीने एक व्हिडीओ पोस्ट करत दिली. सोशल मीडियावर राखी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यामुळे राखी आणि आदिल प्रकरणात पुढे काय होणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.