Adipurush Box Office | ‘आदिपुरुष’च्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईत घट; सोशल मीडियावरील टीकेचा कलेक्शनवर परिणाम

| Updated on: Jun 18, 2023 | 12:08 PM

या चित्रपटाची सुरुवात रावणाला ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानापासून होते. प्रभू श्रीराम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणासह अयोध्या सोडून वनवासाला निघतात, इथपर्यंतची कथा चित्रपटाच्या सुरुवातीच्या गाण्यातून आटोपण्यात आली आहे.

Adipurush Box Office | आदिपुरुषच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईत घट; सोशल मीडियावरील टीकेचा कलेक्शनवर परिणाम
Adipurush
Follow us on

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता प्रभास, क्रिती सनॉन, सैफ अली खान, सनी सिंह आणि देवदत्त नागे यांच्या भूमिका आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने दमदार कमाई केली. पहिल्या दिवशी जगभरातील कमाईचा आकडा तब्बल 140 कोटी रुपये इतके होता. तर दुसऱ्या दिवशी 65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ही सर्व भाषांमधील कमाई आहे. केवळ हिंदी भाषेतील आदिपुरुषची कमाई ही गेल्या दोन दिवसांत जवळपास 37 कोटी रुपये इतकी झाली. तर तेलुगू भाषेत दुसऱ्या दिवशी 26 कोटी रुपयांची कमाई झाली.

आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यातील बऱ्याच सीन्सवर आणि डायलॉग्सवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. छत्तीसगडमधील मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर देशभरात बंदी घालण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. मात्र असं असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गेल्या दोन दिवसांत चांगली कामगिरी केली आहे.

प्रदर्शनाच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘आदिपुरुष’ हा चौथा चित्रपट ठरला आहे. यामध्ये पहिल्या स्थानी RRR, दुसऱ्या स्थानी बाहुबली 2 आणि तिसऱ्या स्थानी केजीएफ 2 आहे.

हे सुद्धा वाचा

RRR- 222 कोटी रुपये
बाहुबली : द कन्क्लुजन- 214 कोटी रुपये
केजीएफ : चाप्टर 2- 164.5 कोटी रुपये
आदिपुरुष- 140 कोटी रुपये

‘आदिपुरुष’ या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. यामध्ये अभिनेता प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सनी सिंहने शेष, सैफ अली खानने लंकेश आणि देवदत्त नागेनं बजरंग बलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि तमिळ भाषेतही प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाची सुरुवात रावणाला ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानापासून होते. प्रभू श्रीराम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणासह अयोध्या सोडून वनवासाला निघतात, इथपर्यंतची कथा चित्रपटाच्या सुरुवातीच्या गाण्यातून आटोपण्यात आली आहे. चित्रपटाच्या तीन तासांत केवळ राम, लक्ष्मण आणि सीता यांचा वनवास ते रावणाला हरवून सीतेला परत आणायची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील काही सीन्स आणि डायलॉग्सवरून प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे.