Adipurush | ‘हनुमानजींना थिएटरमध्ये बसवून हे दाखवणं?’; ‘आदिपुरुष’मधील विभीषणच्या पत्नीच्या सीनवरून वाद

'हनुमानजींना थिएटरमध्ये बसवून हे दाखवणं?' असा सवाल कपिल मिश्रा यांनी ट्विटमध्ये केला आहे. 'आदिपुरुष'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रत्येक थिएटरमधील एक जागा ही बजरंग बलीसाठी राखीव ठेवणार असल्याचं निर्मात्यांनी जाहीर केलं होतं. त्यावरूनच कपिल मिश्रा यांनी हा टोला लगावला आहे.

Adipurush | 'हनुमानजींना थिएटरमध्ये बसवून हे दाखवणं?'; 'आदिपुरुष'मधील विभीषणच्या पत्नीच्या सीनवरून वाद
Kapil Mishra on AdipurushImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 3:18 PM

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला जोरदार विरोध केला जातोय. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांची निराशा झाली. काहींना त्यातील डायलॉग्स आवडले नाहीत, तर काहींना व्हीएफएक्स पसंत पडले नाहीत. या सर्व वादादरम्यान आता आदिपुरुष चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विभीषणच्या पत्नीचा हा सीन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भाजप नेता कपिल मिश्रा यांनी आता सीनचा स्क्रीनशॉट शेअर करत ट्विट केलं आहे.

‘हनुमानजींना थिएटरमध्ये बसवून हे दाखवणं?’ असा सवाल कपिल मिश्रा यांनी ट्विटमध्ये केला आहे. ‘आदिपुरुष’च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रत्येक थिएटरमधील एक जागा ही बजरंग बलीसाठी राखीव ठेवणार असल्याचं निर्मात्यांनी जाहीर केलं होतं. त्यावरूनच कपिल मिश्रा यांनी हा टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

नेमका काय आहे सीन?

‘आदिपुरुष’ या चित्रपटात जेव्हा विभीषण आणि त्यांची पत्नी राघव (प्रभू श्रीराम) यांच्याकडे येतात, तेव्हाचा हा सीन आहे. अभिनेत्री तृप्ती तोरडमलने विभीषण यांची पत्नी सरमाची भूमिका साकारली आहे. हा सीन तृप्तीच्या कपडे बदलण्याचा आहे. तृप्ती ही मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आदिपुरुष या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिचे वडील मधुकर तोरडमल हेसुद्धा मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहेत.

कथेची गरज नसतानाही तृप्तीच्या कपडे बदलण्याचा सीन का दाखवण्यात आला, असा सवाल नेटकरी करत आहेत. तर ‘आदिपुरुष’सारख्या चित्रपटात या सीनची गरजच काय, असंही अनेकांनी म्हटलंय. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून रोजी जगभरात प्रदर्शित झाला. यामध्ये प्रभास, क्रिती सनॉन, सनी सिंग, सैफ अली खान, देवदत्त नागे यांच्या भूमिका आहेत. गेल्या तीन वर्षांपासून या बिग बजेट चित्रपटाचं काम सुरू होतं. मात्र प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. या चित्रपटातील व्हीएफएक्स, कलाकारांचा लूक आणि डायलॉग्सवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे.

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.