मुंबई | १६ जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र वाऱ्यारासारखी पसरत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सतत दिग्दर्शक ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ सिनेमाचा विरोध होत आहे.. सिनेमाचा सर्वच स्तरातून विरोध होत आहे. एवढंच नाही तर, सिनेमातील कलाकारांचा देखील प्रेक्षक विरोध करत आहेत.. अभिनेता प्रभास याने राघव ही भूमिका साकारली आहे. सिनेमात क्रिती सनॉन जानकी तर अभिनेता सैफ अली खान लंकेश या भूमिकेत झळकला आहे.. सनी सिंग यांने लक्ष्मण ही भूमिका साकारली असून अभिनेता देवदत्त नागे याने हनुमानाच्या भूमिकेला न्याय दिलं आहे. पण सिनेमात हनुमान यांची भूमिका साकारणं आणि सोशल मीडियावर ‘आदिपुरुष’ सिनेमा संबंधीत एक व्हिडीओ पोस्ट करणं अभिनेता देवदत्त नागे याला चांगलंच महागात पडलं आहे..
सिनेमात हनुमान यांची भूमिका साकारणाऱ्या देवदत्त नागे यांनी सिनेमा पाहून चित्रपटागृहाबाहेर आलेल्या प्रेक्षकांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये प्रेक्षक सिनेमाचं कौतुक करताना दिसत आहेत. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘मिळालेल्या अपार प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत!…’ असं लिहिलं आहे…
पण अभिनेत्याचा व्हिडीओ आणि कॅप्शन पाहून चाहते भडकले आहे.. चाहते देवदत्त नागे याला म्हणाले, ‘जय मल्हारमधील तुझं काम छान होतं पण, आदिपुरुषमध्ये डायलॉग तुला पटले का?’ असा प्रश्न चाहत्यांनी अभिनेत्याला विचारला आहे.. सिनेमातील डायलॉग ‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का.. जलेगी भी तेरे बाप की… यांसारख्या अनेक डायलॉगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
देवदत्त नागे याने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘हिंदू धर्माची बदनामी केली तुम्ही नागे जी…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘थोडी तरी लाज वाटू द्या… बजरंगबली तुम्हाला माफ करणार नाहीत…’ सध्या ‘आदिपुरुष’ सिनेमातील हनुमानाच्या भूमिकेमुळे चाहते देवदत्त नागे याचा विरोध करत आहेत….
दरम्यान, आदिपुरुष प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमातील डायलॉग आणि रामायण चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांवर होत आहे. ट्विटरवरुन नकारात्मक कमेंट डिलीट करण्यासाठी निर्मात्यांनी नेटकऱ्यांना मोठी ऑफर दिल्याची चर्चा रंगत आहे.
सध्या सिनेमा सर्वच स्तारातून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शिवाय अनेक ठिकाणी सिनेमा बॅन करण्याची देखील मागणी होत आहे… त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता ‘आदिपुरुष’ सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…