Adipurush | गुपचूप ‘ही’ गोष्ट करण्यासाठी सर्वसामान्यांना मेकर्स देत आहेत पैसे? सिनेमाच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप

'आदिपुरुष' सिनेमाच्या वादात निर्मात्यांनी सर्वसामान्य जनतेला ओढलं, हजारो रुपयांची ऑफर देत करायला लावतायेत असं काम? 'आदिपुरुष' सिनेमाच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप

Adipurush | गुपचूप 'ही' गोष्ट करण्यासाठी सर्वसामान्यांना मेकर्स देत आहेत पैसे? सिनेमाच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 1:43 PM

मुंबई : अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सनॉन स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमा प्रदर्शनानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या सर्वत्र आदिपुरुष सिनेमाची चर्चा रंगली आहे. सेलिब्रिटी आणि सिनेमा विश्लेषकांनीच नाही तर, अनेक प्रेक्षकांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून मल्टी स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमाचा विरोध केला आहे. पण सिनेमाला होत असलेला विरोध पाहता निर्मत्यांनी मोठी शक्कल लढवल्याची चर्चा रंगत आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी रंगणाऱ्या वादात सर्वसामान्य जनतेला ओढल्याचा आरोप होत आहे. ज्यामुळे सिनेमा आणि निर्मात्यांच्या अडचणीत मोठी वाढ होत आहे. सिनेमा १६ जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.

आदिपुरुष प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमातील डायलॉग आणि रामायण चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांवर होत आहे. सिनेमातील डायलॉग ‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का.. जलेगी भी तेरे बाप की… यांसारख्या अनेक डायलॉगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याच दरम्यान सिनेमाच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत..

ट्विटरवरुन नकारात्मक कमेंट डिलीट करण्यासाठी निर्मात्यांनी नेटकऱ्यांना मोठी ऑफर दिल्याची चर्चा रंगत आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सने दावा केला आहे की, निर्मात्यांनी नेटकऱ्यांना ट्विटरवरुन नकारात्मक कमेंट डिलीट करण्यासाठी पैसे देण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे..

हे सुद्धा वाचा

एक नेटकरी म्हणाला, ‘सिनेमाच्या टीमने मला मेसेज केला आणि कमेंट डिलीट करण्यासाठी सांगितलं. त्यासाठी त्यांनी मला पैसे देखील ऑफर केले होते…’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘मला नकारात्मक कमेंट डिलिट करण्यासाठी ५ हजार ५०० रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला..’ एवढंच नाही तर सिनेमाबद्दल सकारात्मक लिहिण्यासाठी मला ९ हजार ५०० रुपयांची ऑफर आली होती… असं देखील एका नेटकऱ्याने म्हटलं आहे..

सध्या सिनेमा सर्वच स्तारातून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शिवाय अनेक ठिकाणी सिनेमा बॅन करण्याची देखील मागणी होत आहे… त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता ‘आदिपुरुष’ सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

‘आदिपुरुष’ सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. सिनेमात अभिनेता प्रभास याने राघव ही भूमिका साकारली आहे. सिनेमात क्रिती सनॉन जानकी तर अभिनेता सैफ अली खान लंकेश या भूमिकेत झळकला आहे.. सनी सिंग यांने लक्ष्मण ही भूमिका साकारली असून अभिनेता देवदत्त नागे याने हनुमानाच्या भूमिकेला न्याय दिलं आहे.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.