Adipurush Trailer | अंगावर काटा आणणारा ‘आदिपुरुष’चा ट्रेलर पाहिलात का? ओम राऊतने केले मोठे बदल

रामायणावर आधारित या चित्रपटात प्रभासने राम, क्रिती सनॉनने सीता तर सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओम राऊतने 'आदिपुरुष'चं दिग्दर्शन केलं आहे.

Adipurush Trailer |  अंगावर काटा आणणारा 'आदिपुरुष'चा ट्रेलर पाहिलात का? ओम राऊतने केले मोठे बदल
Adipurush Trailer Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 2:29 PM

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. रामायणावर आधारित या चित्रपटात प्रभासने राम, क्रिती सनॉनने सीता आणि सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे यामध्ये हनुमानाच्या भूमिकेत आहे. 3 मिनिटं 19 सेकंदांच्या या ट्रेलरला अवघ्या काही मिनिटांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हा चित्रपट सहा महिने आधीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलाकारांच्या लूकवरून आणि व्हिएफएक्सच्या दर्जावरून अनेकांनी टीका केली. त्यानंतर चित्रपटात महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाचं प्रदर्शन पाच ते सहा महिने पुढे ढकललं. आता हा चित्रपट येत्या 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

रामायणाची कथा सर्वांनाच माहीत आहे. मात्र ‘आदिपुरुष’मध्ये ती नव्या ढंगाने मांडण्यात आली आहे. ट्रेलरमधील व्हिएफएक्स हे टीझरपेक्षा उत्तम असल्याचं सहज दिसून येत आहे. यातील कलाकारांच्या लूकमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफचा साधूमधील वेशांतर केलेला लूक ट्रेलरमध्ये पहायला मिळतो. मात्र सैफचा दुसरा लूक अद्याप ट्रेलरमध्ये पूर्णपणे दाखवण्यात आलेला नाही.

पहा ट्रेलर

हे सुद्धा वाचा

या चित्रपटाच्या ट्रेलरवर अनेकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. रामाच्या भूमिकेतील प्रभासचं तोंडभरून कौतुक होत आहे. ‘बाहुबली’प्रमाणेच त्याचा हा चित्रपटसुद्धा ब्लॉकबस्टर होईल असं चाहते म्हणत आहेत. तर व्हिएफएक्समध्ये केलेला सुधार नेटकऱ्यांना आवडला आहे.

चित्रपटातील बदलाविषयी ओम राऊत म्हणाले, “त्या पाच – सहा महिन्यांचा कालावधी मिळणे ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आव्हानं प्रत्येक गोष्टीत असतात. पण ही आव्हानं आमच्या चित्रपटाला अधिक चांगला आणि मजबूत बनवेल. आम्ही अशा तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे जो मार्व्हल, डीसी, अवतार यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवला गेला आहे.”

या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिजने केली आहे. टी-सीरिजचे निर्माते भूषण कपूर चित्रपटाविषयी म्हणाले, “सुरुवातीला मिळालेला नकारात्मक प्रतिसाद नेहमीच पुढे जाऊन कामी येतो. आम्ही थोडे निराश झालो होतो. पण आम्ही पुन्हा चित्रपटावर मेहनत घेतली. घडलेल्या गोष्टींमधून आम्ही शिकलो आणि त्यातून पुढे येण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांनी सुचवलेल्या गोष्टींनुसार आम्ही काही बदल केले. आता आम्ही जो चित्रपट बनवला आहे, त्यावर खूप खुश आहोत.”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.