राणी मुखर्जीचं वैवाहिक आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य, ‘लग्नानंतर प्रेम संपत, कारण…’

Aditya Chopra Happy Birthday | आदित्य चोप्रा यांची दुसरी पत्नी आहे राणी मुखर्जी, पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर राणीसोबत अडकले विवाहबंधनात, पण लग्नाच्या 10 वर्षांनंतर राणी म्हणते, 'लग्नानंतर प्रेम संपत, कारण...', सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

राणी मुखर्जीचं वैवाहिक आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य, 'लग्नानंतर प्रेम संपत, कारण...'
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 11:42 AM

अभिनेत्री राणी मुखर्जी आता बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसते. पण अभिनेत्री कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. राणी मुखर्जी हिने सिनेमा दिग्दर्शक, निर्माता आदित्य चोप्रा यांच्यासोबत लग्न केलं. राणी आणि आदित्य यांना एक मुलगी देखील आहे. इतर स्टारकिड्स प्रमाणे राणीची लेक चर्चेत नसते. पण मुलाखतीत अभिनेत्री लेक आणि पतीबद्दल अनेक गोष्टी सांगत असते. एका मुलाखतीत राणी हिने मोठं वक्तव्य केलं होतं. लग्नानंतर प्रेम संपत असं अभिनेत्री म्हणाली होती. एवढंच नाही तर अनेक महिलांना मी चुकीच्या नात्यात अडकताना पाहिलं आहे… असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.. सांगायचं झालं तर आहे अदित्य यांचा वाढदिवस असल्यामुळे राणी हिने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

मुलाखतीत पती आदित्य यांचं कौतुक करत राणी म्हणाली होती, ‘आदित्य एक उत्तम पुरुष आहे. लोकांचा आदर कसा करायला हवा त्याला माहिती आहे. मी अशा घरात मोठी झाली आहे, जेथे लोकांचा आदर, सन्मान कसा करायचा हे मला शिकवलं आहे. पहिल्यांदा जेव्हा आदित्य याला पाहिलं तेव्हा त्याची वागणूक मला आवडली. टीममध्ये त्याची लिडरशीप पाहून मी आकर्षित झाली…’

‘आदित्य मनाने फार चांगला आहे. पती-पत्नीच्या नात्यात सुरुवातील तुम्ही एकमेकांकडे आकर्षित होता. पण लग्नानंतर प्रेम कमी होतं. पण एकमेकांसाठी मनात असलेला आदर कमी व्हायला नको… आदर आणि सन्मान कमी झाल्यानंतर नात्यात काहीही शिल्लक राहात नाही…’

हे सुद्धा वाचा

इंडस्ट्रीबद्दल देखील राणी हिने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मी गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. माझ्या आयुष्यात इंडस्ट्रीमधील पुरुषाची एन्ट्री होणार होती तर, आदित्य याच्याशिवाय दुसऱ्या कोणाची झाली नसती… असं देखील अभिनेत्री म्हणाली.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

एवंढच नाहीतर, अभिनेत्रीने वाईट नात्यांबद्दल देखील सांगितलं. अनेक महिला अशा आहेत, ज्या फक्त लग्न केलं आहे म्हणून आयुष्य जगत आहेत. पण त्या कधीच स्वतःचे विचार मांडू शकत नाहीत. महिलांना अनेक वर्षांनंतर कळतं, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. लग्न एका योग्य कारणासाठी झालं पाहिजे. जर तुम्ही चुकीच्या कारणामुळे लग्न करत असाल तर संपूर्ण आयुष्य खराब होईल… असं देखील अभिनेत्री म्हणाली.

राणी आणि आदित्य यांनी 2014 मध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सर्वत्र राणी आणि आदित्य यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.