तर सचिन तेंडुलकर हे अमिताभ बच्चन यांचे सावत्र मुलगा असते? जाणून घ्या सत्य
Amitabh Bachchan : 'ती' गोष्ट सत्यात उतरली असती तर, अमिताभ बच्चन यांचा मुलगा असते सचिन तेंडुलकर? सत्य अखेर समोर... सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांच्या नात्याची चर्चा... एका मोठ्या कारणामुळे अमिताभ बच्चन पुन्हा चर्चेत
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांच्या चाहते फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील आहेत. म्हणून बिग बी यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. बिग बी यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता सुद्धा अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एक मोठी गोष्ट समोर येत आहे. क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर महानायक अमिताभ बच्चन यांचे सावत्र मुलगा असते अशी चर्चा सध्या रंगत आहे… तर रंगणाऱ्या चर्चांमागील नक्की सत्य काय आहे जाणून घेऊ.
क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर महानायक अमिताभ बच्चन यांचे सावत्र मुलगा असते… ही गोष्ट समोर आल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसला असेल. रंगणाऱ्या चर्चांमागे एक सत्य दडलेलं आहे. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहब्बतें’ सिनेमात अमिताभ बच्चन यांनी गुरुकुलच्या मुख्यध्यापकांच्या भूमिकेला न्याय दिला.
सिनेमातील बिग बी यांच्या भूमिकेचं नाव नारायण शंकर असं होतं. रिपोर्टनुसार, सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या सावत्र मुलाच्या भूमिकेसाठी सचिन तेंडुलकर यांना साईन करण्यात आलं होतं. पण नंतर स्किप्टमधून बिग बी यांच्या सावत्र मुलाची भूमिका हटवण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य चोप्रा यांनी सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेत्री श्रीदेवी यांना देखील विचारना केली होती. दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं चित्र ‘मोहब्बतें’ सिनेमात दिसणार होतं. पण श्रीदेवी यांनी भूमिकेसाठी नकार दिला. त्यानंतर याच भूमिकेसाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना विचारण्यात आलं.
सांगायचं झालं तर, सिनेमाला प्रदर्शित होऊन अनेक वर्ष लोटली आहेत. पण आजही ‘मोहब्बतें’ सिनेमा तितक्याच आवडीने पाहिला जातो. सिनेमातील शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. ‘मोहब्बतें’ सिनेमाच्या माध्यमातून अनेक नव्या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
उदय चोप्रा, जुगल हंसराज, झिम्मी शेरगिल, शमिता शेट्टी, किस शर्मा, प्रिती झंगियानी यांच्यासोबत अनेक कलाकारांच्या करियरला एक नवी दिशा मिळाली. सिनेमाची निर्मिता यश चोप्रा यांनी केली होती. तर सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य चोप्रा यांनी केलं होतं. मोहब्बतें सिनेमाची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेली असते.