Aditya Roy Kapur |अनन्या पांडेसोबत डेटिंगच्या चर्चांदरम्यान आदित्य रॉय कपूरने सांगितले लग्नाचे प्लॅन्स

दिवाळी पार्टीत जेव्हा दोघांनी एकाच रंगसंगतीचे कपडे घालून एण्ट्री केली, तेव्हा सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. अनन्याने जेव्हा 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये हजेरी लावली, तेव्हा करणने तिला थेट प्रश्न विचारला होता.

Aditya Roy Kapur |अनन्या पांडेसोबत डेटिंगच्या चर्चांदरम्यान आदित्य रॉय कपूरने सांगितले लग्नाचे प्लॅन्स
Aditya Roy Kapur and Ananya Panday
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 24, 2023 | 12:41 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे. लॅक्मे फॅशन वीकमध्ये या दोघांना एकत्र रॅम्प वॉक करताना पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण त्याआधीपासून अनन्या आणि आदित्य एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. या दोघांनी अद्याप रिलेशनशिपची कबुली दिली नाही किंवा चर्चांना नकारही दिला नाही. त्यामुळे त्यांच्यात नेमकं काहीतरी शिजतंय, अशी शंका चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. आदित्य लवकरच ‘गुमराह’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत आदित्यने त्याचे लग्नाविषयीचे प्लॅन्स सांगितले.

गुरुवारी गुमराह या चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंगचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आदित्यला त्याच्या ‘वेडिंग प्लॅन्स’विषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “मला वाटतंय की प्रत्येकजण लग्न करतोय, पण मीच मागे राहतोय की काय अशी मला किंचितही भीती नाही. त्यामुळे मी माझा पुरेसा वेळ घेणार आहे. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी लग्नाबाबत विचार करेन.”

रॅम्प वॉकशिवाय आदित्य आणि अनन्याला विविध ठिकाणी एकत्र पाहिलं गेलं. दिवाळी पार्टीत जेव्हा दोघांनी एकाच रंगसंगतीचे कपडे घालून एण्ट्री केली, तेव्हा सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. अनन्याने जेव्हा ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली, तेव्हा करणने तिला थेट प्रश्न विचारला होता. “मी तुला माझ्या पार्टीत पाहिलं होतं. तुझ्यात आणि आदित्य रॉय कपूरमध्ये काय शिजतंय”, असं त्याने विचारलं. त्यावर उत्तर देताना अनन्या म्हणाली, “मला आदित्य रॉय कपूर हॉट वाटतो.”

आदित्यचा ‘गुमराह’ हा चित्रपट येत्या 7 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील भूमिकेविषयी तो म्हणाला, “मी माझ्या चित्रपटांमध्ये कधीच दुहेरी भूमिका साकारली नव्हती. माझ्यासाठी हे आव्हान होतं पण काम करताना मजा आली. दोन्ही भूमिका पूर्णपणे वेगळ्या होत्या. थ्रिलर चित्रपटात काम करताना तुम्हाला एक पाऊल पुढे राहावं लागतं.”