Parineeti Raghav Wedding | परिणीती – राघव यांच्या लग्नातील आदित्य ठाकरे यांचे फोटो समोर
Parineeti Raghav Wedding | मित्राच्या लग्नासाठी आदित्य ठाकरे यांची उपस्थिती... परिणीती - राघव यांच्या लग्नातील फोटो पोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले..., सध्या सर्वत्र परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची चर्चा... फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल...
मुंबई : 26 सप्टेंबर 2023 | २४ सप्टेंबर २०२३ अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने पती राघव चड्ढा यांच्यासोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. मोठ्या थाटात राघव आणि परिणीती यांनी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं आहे. सध्या सर्वत्र राघव आणि परिणीती यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. लग्नात सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले नाहीत. लग्नानंतर खुद्द परिणीती आणि राघव यांनी लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. राघव – परिणीती यांच्या लग्नात अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या…
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे देखील राघव आणि परिणीती यांच्या लग्नात उपस्थित होते. लग्नासाठी जाताना आदित्य ठाकरे यांनी विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. आता खुद्द आदित्य ठाकरे यांनी लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्यांच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर करत आहेत..
View this post on Instagram
आदित्य ठाकरे यांनी पोस्ट केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ते राघव आणि परिणीती यांच्यासोबत पोज देताना दिसत आहेत.तर दुसऱ्या फोटोमध्ये आदित्य ठाकरे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आप पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्यासोबत बसलेले दिसत आहेत. फोटो पोस्ट करत आदित्य ठाकरे यांनी कॅप्शनमध्ये, ‘तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा… तुम्हाला आयुष्यभर आनंद, उत्तम आरोग्य आणि प्रेम लाभो हीच सदिच्छा…’ असं लिहिलं आहे.
परिणीती आणि राघव यांनी केला डान्स
लग्नानंतर परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा डान्स करताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राघव आणि परिणीती यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओची चर्चा रंगत आहे.
लग्नाचे फोटो पोस्ट करत परिणीतीने चाहत्यांसोबत शेअर केला आनंद.. इंस्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो पोस्ट करत परिणीती चोप्रा हिने कॅप्शनमध्ये, ‘नाश्त्याच्या टेबलवरील पहिल्या गप्पांपासूनच आम्हाला माहीत होतं की आम्ही एकमेकांसाठीच आहोत. या दिवसाची प्रतीक्षा आम्ही खूप काळापासून केली. अखेर आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहोत. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकलो नसतो. इथपासून आमच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली.’ असं लिहिलं.