India-China Face off: भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या ‘मित्रा’ला धुतलं; अदनान सामीने शेअर केला Video
तवांगमध्ये चिनी सैनिकांना भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर; व्हिडीओ शेअर करत अदनान सामी म्हणाला..
मुंबई: प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामीने जेव्हा भारतीय नागरिकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. यामागचं कारणंही त्याने एका पोस्टद्वारे सांगितलं होतं. पाकिस्तानने माझ्यासोबत काय केलं, याचा खुलासा करणार असल्याचं ट्विट त्याने केलं होतं. अशातच आता तवांगमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीचा एक व्हिडीओ अदनाने शेअर केला आहे. मात्र हा व्हिडीओ कधीचा आहे हे माहीत नसल्याचं त्याने स्पष्ट केलंय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये असा दावा केला जातोय की हा भारतीय आणि चिनी सैनिकांच्या झटापटीचा व्हिडीओ आहे. ‘तवांगमध्ये घडलेल्या घटनेनंतर भारतीय आणि चिनी सैनिकांचा हा व्हिडीओ शेअर केला जातोय. काहीजण याला जुना व्हिडीओ म्हणत आहेत. हा व्हिडीओ जुना किंवा नवीन असला तरी फरक पडत नाही. मात्र ज्याप्रकारे आपल्या जवानांनी सीमेवर शौर्य दाखवलं, ते महत्त्वाचं आहे. त्यासाठी फक्त कृतज्ञता बाळगा’, असं अदनानने लिहिलंय.
2 मिनिट 47 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये भारतीय सैनिक हे चिनी सैनिकांचा सामना करताना दिसत आहेत. जसं त्यांनी तार तोडून घुसण्याचा प्रयत्न केला, तसं भारतीय सैनिक त्यांच्यावर तुटून पडले आणि त्यांना मागे हटण्यास हतबल केलं.
This VDO of a clash between Indian & Chinese soldiers is being shared regarding d Tawang incident. Some r dismissing it as an ‘Old VDO’. “It doesn’t matter if it’s old or new… What matters is d courage wt which our soldiers r defending d border! For that, just be grateful!!”? pic.twitter.com/k9FivXCWQW
— Adnan Sami (@AdnanSamiLive) December 13, 2022
अदनान सामीने 2016 मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारलं होतं. ‘अनेकजण मला विचारतात की मला पाकिस्तानबद्दल इतका तिरस्कार का आहे? मात्र कटू सत्य हे आहे की माझ्याशी चांगलं वागणाऱ्या पाकिस्तानच्या लोकांबद्दल माझ्या मनात अजिबात तिरस्कार नाही. मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो. मात्र मला तिथल्या आस्थापनेशी संबंधित समस्या आहे. माझं पाकिस्तान सोडण्यामागचं हेच मोठं कारण होतं’, असं त्याने लिहिलं होतं.