’18 महिने स्वतःच्या मुलासाठी…’, घटस्फोटाच्या २७ वर्षांनंतर प्रसिद्ध गायकाच्या पहिल्या पत्नीकडून खंत व्यक्त
अभिनेत्रीने प्रसिद्ध गायकासोबत १९९३ साली केलं लग्न, मुलाला जन्म दिल्यानंतर तीन वर्षात घेतला विभक्त होण्याचा निर्णय... 'ते' १८ महिने तिच्यासाठी होते अत्यंत वाईट
मुंबई | 25 जुलै 2023 : बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या काही वर्षींनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे सेलिब्रिटींच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. आता देखील अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि प्रसिद्ध गायकाने लग्न केलं. त्यांना एक मुलगा देखील झाला. पण लग्नाच्या तीन वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुलाच्या कस्टडीवरून दोघांमध्ये अनेक वाद झाले. सध्या ज्या सेलिब्रिटींच्या आयुष्याची चर्चा रंगत आहे, त्या गायकाचं नाव अदनान सामी आणि अभिनेत्री नाव झेबा बख्तियार असं आहे.
अदनान सामी आणि झेबा बख्तियार यांनी १९९३ मध्ये मोठ्या आनंदात लग्न केलं. पण लग्नाच्या तीन वर्षांनंतर म्हणजे १९९६ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत झेबा बख्तियार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. घटस्फोटाच्या २७ वर्षांनंतर अभिनेत्रीने अदनान सामी यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
अदनान सामी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर झेबा बख्तियार यांनी सिनेमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. झेबा बख्तियार म्हणाल्या, ‘अदनान सामी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर मी माझ्या राहिलेल्या सिनेमांचं शुटिंग पूर्ण केलं. तेव्हा अभिनय क्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेत लेखण, निर्मिती क्षेत्रात करियर करण्याची माझी इच्छा होती…’
‘माझं अदनान यांच्यासोबत लग्न झालं. आम्हाला मुलगा झाला. मी कुटुंबात पूर्णपणे व्यस्त होती. पण आमचं नातं अधिक काळ टिकू शकलं नाही. अखेर मी सिनेमांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. पण घटस्फोटादरम्यान अभिनेत्रीला मोठ्या संकटांचा सामना करावा लागला.
घटस्फोटाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मला तेव्हा कोणत्याच गोष्टीची शुद्ध नव्हती. मला मुलाची कस्टडी मिळाल्यामुळे मी आनंदी होती. मुलाच्या कस्टडीसाठी मी तब्बल १८ महिने संघर्ष केला. तेव्हा मी काहीच काम करत नव्हती. पण मुलाची कस्टडी मिळाल्यानंतर मी परदेशात एका मालिकेच्या शुटिंगसाठी गेली होती…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
झेबा बख्तियार हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘हिना’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. झेबा बख्तियार यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. आज त्या झगमगत्या विश्वापासून दूर असल्या तरी त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा कायम रंगलेली असते. झेबा बख्तियार एक – दोन नाही तर चार वेळा विवाहबंधनात अडकल्या.