बांग्लादेशी अडल्ट फिल्म स्टार आरोही बर्डेला अटक; बनावट पासपोर्टप्रकरणी कारवाई

बांगलादेशी अडल्ट फिल्म स्टार आरोही बर्डेला पोलिसांनी उल्हासनगरमधून अटक केली. बनावट पासपोर्टप्रकरणी तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस रियाच्या भाऊ-बहिणीच्याही शोधात आहेत.

बांग्लादेशी अडल्ट फिल्म स्टार आरोही बर्डेला अटक; बनावट पासपोर्टप्रकरणी कारवाई
अडल्ट स्टार आरोही बर्डेImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 27, 2024 | 9:10 AM

भारतात बनावट कागदपत्रांच्या आधारे राहिल्याप्रकरणी पॉर्नस्टार रिया बर्डेला उल्हासनगरमध्ये हिल लाइन पोलिसांनी अटक केली. रिया बर्डे हे आरोही बर्डे आणि बन्ना शेख या नावानेही ओळखली जाते. मूळची बांगलादेशची असलेली रिया भारतात तिची आई, बहीण आणि भावासोबत बेकायदेशीरपणे राहत असल्याचा आरोप आहे. भारतात राहण्यासाठी रियाच्या आईने अमरावतीमधल्या एका व्यक्तीसोबत लग्न केल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी रियासोबतच पोलिसांनी तिची आई अंजली बर्डे ऊर्फ रुबी शेख, वडील अरविंद बर्डे, भाऊ रविंद्र ऊर्फ रियाज शेख आणि बहीण रितू ऊर्फ मोनी शेख यांच्यावरही आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया ही अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या प्रॉडक्शनशी संबंधित असून तिने अनेक पॉर्न चित्रपटांमध्येही काम केलंय.

याप्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक संग्राम माळकर म्हणाले, “चौकशीदरम्यान आम्हाला आढळलं की रियाची आई अंजली ही बांगलादेशची असून ती भारतात तिच्या मुलांसोबत बेकायदेशीरपणे राहतेय. यासाठी रियाच्या आईने अमरावतीमधल्या अरविंद बर्डे नावाच्या एका पुरुषाशी लग्न केलंय. स्वत:ला पश्चिम बंगालची असल्याचं सांगत तिने हे लग्न केलं. नंतर बनावट जन्माचा दाखला आणि इतर कागदपत्रांच्या आधारे तिने भारतीय पासपोर्टही मिळवला.”

हे सुद्धा वाचा

रियाचा मित्र प्रशांत मिश्रा याने पोलिसांना रिया बांगलादेशी असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. प्रशांतला नुकतंच समजलं होतं की रिया बांगलादेशची राहणारी आहे आणि त्यानंतर त्याने पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. रियाच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ते बनावट असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. रियाचे आई आणि वडील सध्या कतारमध्ये राहत असल्याचं पोलिसांना कळतंय. तर रियाच्या भाऊ आणि बहिणीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. याआधीही मुंबई पोलिसांनी रियाला वेश्या व्यवसायाच्या एका प्रकरणात अटक केली होती.

फडणवीसांच्या कार्यालयची तोडफोड अन् नुकसान, महिलेनं का घातला गोंधळ?
फडणवीसांच्या कार्यालयची तोडफोड अन् नुकसान, महिलेनं का घातला गोंधळ?.
महिलांनो...अजूनही वेळ गेलेली नाही, 'लाडकी बहीण योजने'बाबत मोठी माहिती
महिलांनो...अजूनही वेळ गेलेली नाही, 'लाडकी बहीण योजने'बाबत मोठी माहिती.
शिवरायांचा पुतळा कोसळला कसा? ही 4 कारण समोर, स्थानिक म्हणत होते ते खरं
शिवरायांचा पुतळा कोसळला कसा? ही 4 कारण समोर, स्थानिक म्हणत होते ते खरं.
अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कार नाही, दफनविधीला विरोध, कुटुंबियांची वणवण
अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कार नाही, दफनविधीला विरोध, कुटुंबियांची वणवण.
'डर्टी डझन'चा शेकहँड, शाह अन् मुश्रीफ यांच्या भेटीवरून सुळेंचा निशाणा
'डर्टी डझन'चा शेकहँड, शाह अन् मुश्रीफ यांच्या भेटीवरून सुळेंचा निशाणा.
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु.