Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एक वक्त के बाद सब बोरिंग हो जाता है…’, धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या नात्यावर हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य

Hama Malini: धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी... म्हणून हेमा मालिनी यांची ओळख, धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या नात्यावर हेमा मालिनी म्हणाल्या, 'एक वक्त के बाद सब बोरिंग हो जाता है...', हेमा मालिनी - धर्मेंद्र कायम खासगी आयुष्यामुळे असतात चर्चेत...

'एक वक्त के बाद सब बोरिंग हो जाता है...', धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या नात्यावर हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Dec 08, 2024 | 3:35 PM

Hama Malini – Dharmendra: अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र बॉलिवूडच्या आयकॉनिक कपल पैकी एक आहेत. ‘राजा जानी’, ‘शोले’ आणि ‘दोस्त’ अशा अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर करत दोघांनी चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. चाहत्यांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. त्यानंतर हेमा आणि धर्मेंद्र यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र 1970 पासून एकत्र होते. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 1980 मध्ये लग्न केलं. पण एका मुलाखतीत हेमा यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं. ‘एका वेळेनंतर सर्वकाही बोरिंग वाटू लागतं…’ असं हेमा मालिनी म्हणाल्या होत्या.

सांगायचं झालं तर, ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ईशा देओल हिने आई – वडिलांबद्दल मोठं सत्य सांगितलं होतं. हेमा मालिनी फार वेळ फोनवर बोलत होत्या. ईशा म्हणाली, ‘आई फोनवर बाबांसोबत बोलत होती. अचानक आईच्या घोरण्याचा आवज वडिलांना येऊ लागला…’ ईशाचा हा खुलासा ऐकून कपिलच्या शोमध्ये उपस्थित असलेले प्रेक्षक हसू लागले…

हे सुद्धा वाचा

यावर हेमा मालिनी म्हणाल्या, ‘तेव्हा काय झालं होतं मी सांगते, रात्रभर सिनेमाचं शुटिंग होतं. ज्यामुळे मी प्रचंड थकली होती. प्रेमाच्या गोष्टी एका ठराविक काळापर्यंत चांगल्या वाटतात. पण एका वेळेनंतर सर्वकाही बोरिंग वाटू लागतं…’ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची ‘लव्ह स्टोरी…’

1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुम हसीं मैं जवां’ सिनेमाच्या सेटवर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची पहिली भेट झाली. त्यांची ऑन-स्क्रीन जोडी प्रेक्षकांनाही खूप आवडली. पण जेव्हा दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा हेमाच्या कुटुंबियांचा विरोध होता. मात्र, अनेक संकटांचा सामना केल्यानंतर दोघांनी लग्न केलं.

'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर.
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल.
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?.
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर...
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर....
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?.
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.