सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कशी असायची अभिनेत्रींची अवस्था? भाईजानच्या मित्राने सोडलं मौन
Salman Khan : अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना सलमान खान याने केलंय डेट, पण भाईजानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कशी असायची अभिनेत्रींची अवस्था, सलमान खानचा मित्र म्हणाला, 'सलमानच्या मनात तर...', सध्या सर्वत्र सलमान खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा...
अभिनेता सलमान खान आज वयाच्या 58 व्या वर्षी देखील अविवाहित आहे. सलमान खान याच्या आयुष्यात अनेक अभिनेत्रींची एन्ट्री झाली. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान खान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अभिनेत्री सोमी अली हिच्यापासून अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यापर्यंत सर्वांनी सलमानवर गंभीर आरोप केले. आजही सलमानच्या ब्रेकअपच्या रंगलेल्या असतात. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सलमानचा मित्र आणि अभिनेता प्रदीप रावत याने मोठा खुलासा केला आहे.
अभिनेत्री सोमी अली आणि अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमानची प्रतिक्रिया काय होती? असा प्रश्न प्रदीपला विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, ‘सोमी, संगिता, सलमान यांचा मी तेव्हा खूप चांगला मित्र होतो. संगीतासोबत झालेलं सलमानचं ब्रेकअप मी पाहिलं आहे. सोमीने देखील मला तिची बाजू सांगितली होती. ‘
‘सोमी, सलमान दोघे माझे मित्र होते. दोघांनी मला त्यांची बाजू सांगितली होती. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. संगीता देखील ब्रेकअपनंतर प्रचंड दुःखी होती… सलमान खानला कोण सोडेल…?’ असं देखील अभिनेता म्हणाला.. पुढे प्रदीप याला ‘सलमान खानमुळे ब्रेकअप व्हायचे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर प्रदीप म्हणाला, ‘कधी-कधी काही गोष्टी नकळत होऊ जातात. कोणताही मोठा विषय नसतात नात्यात गैरसमज होतात. सलमान खान उत्तम व्यक्ती आहे. त्याचच्या मनात कोणाबद्दल वाईट भावना नाहीत… तो कधीच कोणाला त्रास देऊ शकत नाही.’ सध्या सर्वत्र सलमान खानच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत.
सलमान खान याच्यापासून का दूर आहे?
गेल्या अनेक वर्षांपासून प्रदीप आणि सलमान एकत्र दिसले नाहीत. यावर अभिनेता म्हणाला, ‘गेल्या अनेक वर्षांपासून मी सलमानला भेटलो नाही. कारण मी सलमानसोबत असतो तर, शेरा याला बॉडीगार्डची जागा भेटली नसती. मीच सलमानचा बॉडीगार्ड झालो असतो.’
‘सलमान खान याच्यासोबत कायम राहिलो असतो तर, माझा स्वतःवर विश्वास नसता. मी स्वतःसाठी काहीही करु शकलो नसतो. म्हणून हळू-हळू मी सलमान खान याच्यापासून लांब झालो.’ प्रदीप याने अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत देखील काम केलं आहे.
सलमान खान याचे आगामी सिनेमे
सलमान खान ‘सिंकदर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.