अश्लील व्हिडीओ प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याला ED कडून समन्स, छापेमारीनंतर मोठी कारवाई

Shilpa Shetty - Raj Kundra: अश्लील व्हिडीओ प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याची पुन्हा होणार चौकशी, तब्बल 15 ठिकाणी छापे टाकल्यानंतर ईडीकडून समन्स जारी, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राज कुंद्रा याची चर्चा...

अश्लील व्हिडीओ प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याला ED कडून समन्स, छापेमारीनंतर मोठी कारवाई
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 9:00 AM

ईडीने पॉर्नोग्राफी आणि अश्लील सिनेमांचं प्रसारण संबंधी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला समन्स जारी केली आहे. राज कुंद्रा याची संबंधित प्रकरणी याच आठवड्यात चौकशी होणार आहे. ईडीने मुंबई आणि उत्तर प्रदेशातील 49 वर्षीय कुंद्रा आणि इतर काही व्यक्तींच्या घरे आणि कार्यालयांसह सुमारे 15 ठिकाणी छापे टाकल्यानंतर हे समन्स जारी करण्यात आलं.

याप्रकरणात सामिल असलेल्या अन्ये लोकांना देखील ईडीने समन्स जारी करत चौकशीसाठी मुंबई कार्यालयात बोलावलं आहे. राज कुंद्रा याला सोमवारी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. दरम्यान, राज कुंद्राचे वकील प्रशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘माझ्या क्लायंटची काही चूक नाही. मी अद्याप माझ्या क्लायंटसोबत चर्चा केलेली नाही. पण मी तुम्हाला सांगू शकतो माझ्या क्लायंटची चुकी नाही. मुंबई पोलिसांच्या चार्जशी पाहिली तर राज कुंद्राचे व्यवहार कायदेशीर आहेत. त्याने कर भरला आहे. मी खात्रीने सांगू शकतो की राज कुंद्राने मनी लाँड्रिंगसारखा कोणताही गुन्हा केलेला नाही. ‘

राज कुंद्रा याला अटक आणि जामिन

मनी लाँड्रिंग प्रकरण हे मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा आणि इतरांविरुद्ध मे 2022 मध्ये दाखल केलेल्या किमान दोन एफआयआर आणि आरोपपत्रांवरून उद्भवले आहे. याप्रकरणी राज कुंद्रा आणि इतर आरोपींना देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर सर्वांची जामिनावर सूटका झाली. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला ईडीने क्रिप्टो करन्सी प्रकरणात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची 98 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. मात्र, त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मालमत्ता जप्तीच्या विरोधात दिलासा मिळाला आहे.

मुंबई पोलिसांकडे माझ्या विरोधात पुरावे नाहीत – राज कुंद्रा

राज कुंद्रा याने 2021 मध्ये मुंबईतील स्थानिक न्यायालयात सांगितलं होतं की, ‘पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये वापरण्यात आलेल्या ‘हॉटशॉट्स’ ॲपला कायद्यानुसार कोणत्याही गुन्ह्याशी जोडण्यासाठी मुंबई पोलिसांकडे माझ्या विरोधात पुरावे नाहीत.’ असं राज कुंद्रा म्हणाला होता. आता पुन्हा याप्रकरणी शिल्पा शेट्टीचा नवरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'.
काळजीवाहू CM गायब,अमावस्या-पौर्णिमेला कोणती शेती?,आदित्य ठाकरेंचा टोला
काळजीवाहू CM गायब,अमावस्या-पौर्णिमेला कोणती शेती?,आदित्य ठाकरेंचा टोला.
पाणी जपून वापरा... मुंबईसह 'या' भागात आजपासून 5 दिवस पाणीकपात
पाणी जपून वापरा... मुंबईसह 'या' भागात आजपासून 5 दिवस पाणीकपात.
'लाडकी बहीण'वरून आढावांचा सवाल, 'महिलांना भाऊबीज म्हणत मग स्वतःच्या..'
'लाडकी बहीण'वरून आढावांचा सवाल, 'महिलांना भाऊबीज म्हणत मग स्वतःच्या..'.
पुन्हा मतमोजणी? EVM वर शंका अन् या 24 उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे धाव
पुन्हा मतमोजणी? EVM वर शंका अन् या 24 उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे धाव.
शपथविधी ठरला, फडणवीस CM होणार पण गृहखात्यावरून टक्कर अन् 2 नंबरची लढाई
शपथविधी ठरला, फडणवीस CM होणार पण गृहखात्यावरून टक्कर अन् 2 नंबरची लढाई.
'EVM मध्ये घोटाळा?', 'या' मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण
'EVM मध्ये घोटाळा?', 'या' मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण.
EVM मध्ये जुगाड? आता महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मध्ये जुगाड? आता महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान.
'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी
'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी.
'या' 24 उमेदवारांचा EVM पडताळणीसाठी अर्ज; उमेदवारांचा EVMवर संशय अन्..
'या' 24 उमेदवारांचा EVM पडताळणीसाठी अर्ज; उमेदवारांचा EVMवर संशय अन्...