सोहैल खानला घटस्फोट दिल्यानंतर मुलांना नेमकं काय हवंय? सीमाकडून खुलासा

घटस्फोटानंतर सीमा सध्या विक्रम अहुजाला डेट करतेय. 1990 मध्ये सीमाने विक्रमशी साखरपुडा केला होता. मात्र सोहैल खानशी लग्न करण्यासाठी ती साखरपुडा मोडून घरातून पळाली होती.

सोहैल खानला घटस्फोट दिल्यानंतर मुलांना नेमकं काय हवंय? सीमाकडून खुलासा
Sohail Khan and Seema SajdehImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 1:08 PM

सलमान खानचा भाऊ, अभिनेता सोहैल खान याने लग्नाच्या 24 वर्षांनंतर पत्नी सीमा सजदेहला घटस्फोट दिला. सोहैल आणि सीमाला दोन मुलं आहेत. ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या नेटफ्लिक्सवरील शोमध्ये सीमा तिच्या घटस्फोटाविषयी आणि त्याचा मुलांवर झालेल्या परिणामाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. घटस्फोटानंतर सीमा वांद्रे इथून लोअर परळला राहायला गेली. यामुळे निर्वाण आणि योहान ही तिची मुलं तिला भेटायला फार कमी येऊ लागल्याची खंत सीमाने बोलून दाखवली. वांद्रे इथंच मुलांना घरासारखं वाटू लागल्याने ती लोअर परळला फार क्वचित सीमाला भेटायला जायची.

“मला दोन मुलं आहेत आणि त्या दोघांमध्ये 11 वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे आमच्या घटस्फोटानंतर त्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला, याचं स्पष्टीकरण कोणतंच ठराविक वय देऊ शकत नाही. आमच्या तुलनेत ते एका अशा जगात वावरत आहेत, जिथे त्यांना प्रचंड माहिती सतत मिळतेय. कधी कधी ही माहिती गरजेपेक्षा जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचते. आमची मुलं सुजाण आणि हुशार आहेत. त्यामुळे त्यांच्यात अधिक आत्मविश्वास आहे. आमच्या काळात हे सर्व शक्य झालं नसतं”, असं सीमा म्हणाली.

हे सुद्धा वाचा

एका एपिसोडमध्ये सीमाचा मोठा मुलगा निर्वाणने सांगितलं की त्याचा छोटा भाऊ योहान हा एके दिवसी ‘घटस्फोट’ या शब्दाचा अर्थ इंटरनेटवर शोधत होता. कारण योहान त्यावेळी खूप लहान होता आणि त्याला घटस्फोट म्हणजे काय, हे सुद्धा माहीत नव्हतं. याबद्दल सीमा म्हणाली, “तो सध्या ठीक आहे. वयातील अंतरामुळे निर्वाण आणि योहान यांच्या स्वभावात फार फरक आहे. निर्वाण त्याची प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत शेअर करतो. जेव्हा त्याची पहिली गर्लफ्रेंड होती, तेव्हा सर्वांत आधी त्याने मला फोन करून सांगितलं होतं. तुझ्याशी भेटायला मी तिला घरी आणू शकतो का?, असं त्याने मला विचारलं होतं. माझ्यासाठी निर्वाण असाच आहे. तो खूप वेगळा आहे. योहान तसा नाहीये.”

सीमा आणि सोहैल यांनी 2022 मध्ये घटस्फोट घेतला. लग्नाच्या 24 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. घटस्फोटाआधी दोघं वेगवेगळे राहू लागले होते. घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर सीमाला हळूहळू या गोष्टीची जाणीव होऊ लागली की मुलांना पालकांकडून काय हवं असतं. याविषयी ती पुढे म्हणाली, “आता घटस्फोटाच्या दोन वर्षानंतर मी हे समजू शकतेय की मुलांना काय हवं असतं? आपले दोन्ही पालक सोबत राहावेत, एवढीच माफक अपेक्षा त्यांची असते. हे सर्वांत महत्त्वाचं आहे आणि दोघांनी एकमेकांसोबत खुश राहावं, असं त्यांना वाटतं. मुलांसाठीही ही गोष्ट चांगली असते. त्यांना कुठेही अडकू नये असं वाटतं.”

'शिवराजने पंचांना गोळ्या घालायला...', पैलवान चंद्रहार पाटलांचं वक्तव्य
'शिवराजने पंचांना गोळ्या घालायला...', पैलवान चंद्रहार पाटलांचं वक्तव्य.
'मला भेटले तेव्हा मुंडेंसोबत कराड पण होता अन्...',जरांगेंचा गौप्यस्फोट
'मला भेटले तेव्हा मुंडेंसोबत कराड पण होता अन्...',जरांगेंचा गौप्यस्फोट.
'मराठ्यांचा संयम सुटला तर...',जरांगे पाटलांची सरकारला हात जोडून विनंती
'मराठ्यांचा संयम सुटला तर...',जरांगे पाटलांची सरकारला हात जोडून विनंती.
मुंडे यांचा राजीनामा होणार? अंजली दमानिया उद्या काय करणार गौप्यस्फोट?
मुंडे यांचा राजीनामा होणार? अंजली दमानिया उद्या काय करणार गौप्यस्फोट?.
'मविआ काळात तुमचे अब्बा होते, आता मस्ती नको',राणेंचा रोख नेमका कुणावर?
'मविआ काळात तुमचे अब्बा होते, आता मस्ती नको',राणेंचा रोख नेमका कुणावर?.
'गरिबांच्या मुलांवर अन्याय मात्र पंचांना...', राक्षेच्या आईचा सवाल
'गरिबांच्या मुलांवर अन्याय मात्र पंचांना...', राक्षेच्या आईचा सवाल.
'सामना'तून अर्थसंकल्पावर टीका, निर्मला सीतारामनांचा 'खडूस' असा उल्लेख
'सामना'तून अर्थसंकल्पावर टीका, निर्मला सीतारामनांचा 'खडूस' असा उल्लेख.
राक्षेनं पंचांना मारली लाथ, महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ
राक्षेनं पंचांना मारली लाथ, महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ.
'माझ्या नादाला लागू नको', जरांगे-भुजबळांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप?
'माझ्या नादाला लागू नको', जरांगे-भुजबळांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप?.
विमानात शिंदेंचा आमदार? राऊतांचा शिंदे अन् शहांबद्दल खळबळजनक दावा काय?
विमानात शिंदेंचा आमदार? राऊतांचा शिंदे अन् शहांबद्दल खळबळजनक दावा काय?.