रणबीर कपूरचं वैवाहिक आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘लग्नानंतर तडजोड…’

Ranbir Kapoor - Alia Bhutt : आलिया भट्ट सोबत लग्न केल्यानंतर कसं आयुष्य जगतोय रणबीर कपूर? 'लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात... ', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणबीर याने वैवाहिक आयुष्याबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा...

रणबीर कपूरचं वैवाहिक आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, 'लग्नानंतर तडजोड...'
Follow us
| Updated on: Jul 28, 2024 | 8:19 AM

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट बॉलिवूडमधील क्यूट कपल आणि यशस्वी कलाकार आहेत. दोघांनी अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यांमुळे आलिया – रणबीर यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता देखील रणबीर कपूर याने खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. लग्नानंतर अनेक गोष्टीत तडजोड करावी लागते… असं वक्तव्य रणबीर याने नुकताच झालेल्या मुलाखतीत केला आहे. सध्या सर्वत्र रणबीर कपूर वैवाहिक आयुष्याबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत रणबीर म्हणाला, ‘लग्नानंतर मी माझ्यातील अनेक गोष्टी बदलल्या आहेत. लग्नानंतर तुम्हाला तुमच्या काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. मी आणि आलिया एकत्र राहाताने सर्वकाही सुरळीत सुरु राहिल… याचा प्रयत्न करत असतो. लग्न झाल्यानंतर तुम्हाला तडजोड करावीच लागते.’

‘आलिया देखील अनेक गोष्टी करत असते. कोणत्याही लग्नात तडजोड करावीच लागते. आपण जसे आहोत, तसं आपल्याला जोडीदाराने स्वीकारलं पाहिजे… असं काहीही नसतं. एकमेकांसाठी काही गोष्टी सोडाव्या लागतात.’ असं देखील रणबीर म्हणाला. सांगायचं झालं तर, आलिया देखील वैवाहिक आयुष्य आणि लेक राहा हिच्याबद्दल कायम बोलताना दिसते.

राहा कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, 6 एप्रिल 2022 मध्ये आलिया हिने राहा हिला जन्म दिला. राहा हिला अनेकदा रणबीर याच्यासोबत स्पॉट करण्यात आलं आहे. तर लेकीबद्दल बोलण्यासाठी रणबीर कोणतीच संधी सोडत नाही. रणबीर कपूर लेक राहा हिच्यावर प्रचंड प्रेम करतो.

रणबीर कपूर याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘ॲनिमल’ सिनेमामुळे रणबीर याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली आहे. चाहत्यांनी रणबीर कपूर याचा ‘ॲनिमल’ सिनेमा डोक्यावप उचलून घेतला. सोशल मीडियावर देखील सिनेमाते अनेक सीन देखील व्हायरल झाले होते. ‘ॲनिमल’ सिनेमाच्या यशानंतर रणबीर कपूर ‘ॲनिमल पार्क’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.