Rhea Chakraborty: तिने तरी का भोगावं? आर्यनला क्लीन चिट मिळाल्यानंतर रिया चक्रवर्ती प्रकरणाच्या चौकशीची मागणी

रिया चक्रवर्ती सध्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतला अमली पदार्थ दिल्याच्या आरोपाखाली जामिनावर आहे. रिया आणि तिचा भाऊ शौविकला अटक करण्यात आली होती.

Rhea Chakraborty: तिने तरी का भोगावं? आर्यनला क्लीन चिट मिळाल्यानंतर रिया चक्रवर्ती प्रकरणाच्या चौकशीची मागणी
Aaryan Khan and Rhea ChakrabortyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 10:29 AM

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह (Aryan Khan) सहा जणांविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचं स्पष्ट करत केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) शुक्रवारी त्यांच्यावरील आरोप रद्द केले. त्यानंतर आता आर्यन खानचं प्रतिनिधित्व करणारे वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) ड्रग्ज प्रकरणाची अशाच पद्धतीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. “मी सोशल मीडियावर मागणी केली होती की रियाच्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि एनसीबी एक विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करून या प्रकरणाचीही चौकशी करू शकते,” असं ते म्हणाले. एसएन प्रधान, डीजी, एनसीबी यांनी सांगितलं की व्हॉट्सॲप चॅट्स कोर्टाला मान्य नाहीत. तिच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नव्हते. कोणत्याही चाचण्या केल्या नव्हत्या. मग तिने तरी का भोगावं, असा सवाल मानेशिंदे यांनी केला.

काय म्हणाले सतीश मानेशिंदे?

“रिया चक्रवर्तीची केसदेखील आर्यनच्या केसचा भाग असलेल्या काही अधिकाऱ्यानी हाताळली होती. यासाठी मी केंद्र सरकार आणि पीएमओला (PMO) विनंती करत आहे. एस. एन. प्रधान आणि उपमहासंचालक संजय सिंग यांनी एसआयटी तयार करून आर्यन खान प्रकरणाच्या तपासातील सत्य उघड केलं ते खूप योग्य केलं. रिया चक्रवर्ती प्रकरणातही त्यांनी असंच करावं. खरंतर मी म्हणेन की त्यांनी सर्व प्रकरणांसाठी असंच केलं पाहिजे. दीपिका पदुकोण, रकुल प्रीत सिंग आणि सारा अली खान या तिघींची एनसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. बॉलिवूड कलाकारांचं इंडस्ट्रीतील आयुष्य हे फक्त 10-20 वर्षे असतं आणि त्यासाठी ते तंदुरुस्त असले पाहिजेत, जे ड्रग्सने होऊ शकत नाही. पण प्रसिद्धीसाठी त्यांनी (NCB) हे केलं आणि सेलिब्रिटींची चौकशी केली. गेल्या तीन वर्षांपासून एनसीबीने बर्‍याच लोकांना त्रास दिला आहे आणि या अधिकार्‍यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. या प्रकरणांमध्ये फक्त व्हॉट्सअॅप चॅट्स होते, कोणतीही चाचणी झाली नव्हती,” अशा शब्दांत त्यांनी एनसीबीवर ताशेरे ओढले.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासह अनेक कलाकारांची एनसीबीने गेल्या वर्षी चौकशी केली होती. पण पुढे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. रिया चक्रवर्ती सध्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतला अमली पदार्थ दिल्याच्या आरोपाखाली जामिनावर आहे. रिया आणि तिचा भाऊ शौविकला अटक करण्यात आली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.