झायरा वसिम, सना खाननंतर आता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली फिल्म इंडस्ट्री

'आता हे सर्व संपवण्याचा निर्णय घेतलाय'; अभिनेत्रीच्या निर्णयाने चाहत्यांना बसला धक्का

झायरा वसिम, सना खाननंतर आता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली फिल्म इंडस्ट्री
सना खान, झायरा वसिमImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 1:47 PM

मुंबई- बॉलिवूड इंडस्ट्री (Film Industry) आणि ग्लॅमरविश्वात येण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मनोरंजनविश्वात आल्यानंतर काहींनी अपेक्षित यश मिळतं, तर काहींना भरपूर स्ट्रगल करावा लागतो. या इंडस्ट्रीत असेही कलाकार आहेत, ज्यांना खूप चांगली प्रसिद्धी मिळाली, तरीसुद्धा त्यांनी यशाच्या शिखरावर असताना अभिनय क्षेत्राला रामराम करण्याचा निर्णय घेतला. ‘दंगल गर्ल’ झायरा वसिम (Zaira Wasim) आणि सना खान या दोघींची उदाहरणं अनेकांना माहीत आहेत. त्यात आता आणखी एका अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. अभिनेत्री सहर अफशाने (Sahar Afsha) इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

सहर ही भोजपुरी चित्रपटसृष्टीतील चर्चेतली अभिनेत्री आहे. ‘मी शोबिज (फिल्म इंडस्ट्री) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे माझा त्याच्याशी काहीच संबंध नसेल’, असं तिने लिहिलं आहे. फिल्म इंडस्ट्री सोडल्यानंतर सहर अफशाने अल्लाहची सेवा करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

सहर अफशाची पोस्ट-

‘मी माझं उर्वरित आयुष्य इस्लामच्या शिकवणीनुसार आणि अल्लाहची सेवा करत व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मी ग्लॅमरविश्वाचा त्याग करते. मला अल्लाहकडून पश्चात्ताप करायचा आहे. मी त्यांची माफी मागते. मी योगायोगाने फिल्म इंडस्ट्रीत आली होती. मात्र आता त्या सर्वांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझं पुढचं आयुष्य मी अल्लाहच्या नावावर करते’, अशी पोस्ट तिने लिहिली.

सहरच्या आधी झायरा वसिम आणि सना खान यांनीसुद्धा इस्लामचं कारण देत इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. झायरा वसिम तिच्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर होती. मात्र अचानक तिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला.

सहरने बऱ्याच भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. खेसारी लाल यादव, पवन सिंह यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत तिने काम केलं. भोजपुरी इंडस्ट्रीत सहरचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे अचानक फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे सहरच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.