राधिकाचा आपटेचा ‘हा’ फोटो पाहून नेटकऱ्यांना आठवली मनी हाईस्टची ‘नायरोबी’, पाहा PHOTO

आपल्या बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत असलेली मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हीने नुकताच एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांना मनी हाईस्टमधील नायरोबी आठवली आहे.

राधिकाचा आपटेचा 'हा' फोटो पाहून नेटकऱ्यांना आठवली मनी हाईस्टची 'नायरोबी', पाहा PHOTO
मनी हाईस्टमध्ये नायरोबीची भूमिका पार पाडणारी अभिनेत्री एल्बा फ्लोर्स
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 6:37 PM

मुंबई : बॉलिवुडमधील एक यशस्वी अभिनेत्री असणारी राधिका आपटे (Radhika Apte) हिने भारतीय चित्रपट जगतात आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. विविध प्रकारची पात्र साकारणारी राधिका भारतात वेब सिरीज अर्थात OTT चित्रपटांतील एक महत्त्वाची अभिनेत्री आहे. नेटफ्लिक्सच्या भारतीय सिरीज आणि चित्रपटात सर्वाधिक झळकलेली अभिनेत्री ही राधिकाच असून आता ती तिच्या एका सोशल मीडियातील पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

राधिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हाईट बिकणी आणि त्यावर लाँग जॅकेट घालून काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्या फोटोंना पाहून ती प्रसिद्ध स्पॅनिश वेब सिरीज मनी हाईस्टमधील नायरोबी हे पात्र साकारणारी अभिनेत्री एल्बा फ्लोर्स हिच्यासारखी दिसत आहे. तिच्या या फोटोला पाहून नेटकऱ्यांना नायरोबीच आठवली असून काहींनी तशा कमेंट्सही केल्या आहेत. तर नेमका कोणता फोटो आहे हा ज्यावर राधिकाला नायरोबी म्हटलं जात आहे. तो तुम्हीही पाहा…

View this post on Instagram

A post shared by Radhika (@radhikaofficial)

मनी हाईस्टचा पाचवा सीजन लवकरच

नेटफ्लिक्सची सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली वेबसीरीज ‘मनी हाईस्ट’च्या 5 व्या सीझनची (Money Heist 5 Trailer) चाहते खूप उत्सुकतेने वाट पाहत आहेत. एक स्पॅनिश शो असूनही,  ही वेब सीरीज जगभर पसंत केली गेली आहे. या सीरीजच्या पाचव्या सीझनचा ट्रेलर देखील काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या ट्रेलरच्या सुरुवातीलाच टोकियोला साखळीने बांधून दिसते आणि नंतर एक सीन येतो जेव्हा इन्स्पेक्टर अॅलिसिया सिएरा प्रोफेसरला पकडतात आणि त्याला साखळीने बांधतात. दुसरीकडे, प्रोफेसर पकडला गेल्यावर रॅकेल या टीमचे नेतृत्व करते आणि हे मिशन पुढे नेते. ट्रेलर प्रचंड थरारक आणि सस्पेन्सने भरलेला आहे. पोलीस आणि प्रोफेसरच्या टीममध्ये जबरदस्त युद्ध होताना दिसते. ट्रेलरच्या शेवटी असे लिहिले आहे की, ‘नेहमी लढा आणि कधीही आत्मसमर्पण करू नका!’ या सीरीजचा 5 वा सीझन खूप महत्वाचा आहे, कारण तो शेवटचा भाग असेल आणि प्रोफेसर हा शेवटचा डाव जिंकतील की हरतील हे त्यातून कळणार आहे.

संबंधित बातम्या : 

Thalaivii : कंगना रनौतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ तारखेला रिलीज होणार ‘थलायवी’

‘सालार’चं आणखी एक दणकट पोस्टर पाहिलात का? प्रभासच्या नव्या फिल्मची उत्सुकता, केजीएफच्या फॅन्ससाठी नवी पर्वणी

रामू जेव्हा जॅकीच्या भूमिकेत शिरतो तेव्हा ‘रंगिला’ बनतो, खासगी व्हिडीओ वेगानं व्हायरल

(After seeing Actress Radhika aptes this photo people rememberes nairobi from money heist)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.