Ranbir Kapoor: मला कधीही मरण…, राहाच्या जन्मानंतर रणबीर कपूरला सतावयेत मोठी भीती

Ranbir Kapoor: लेक राहा हिच्या जन्मानंतर रणबीर कपूरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, 'मला कधीही मरण...', वयाच्या 'या' वर्षात होणार निधन? सध्या रणबीर कपूर खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत....

Ranbir Kapoor:  मला कधीही मरण..., राहाच्या जन्मानंतर रणबीर कपूरला सतावयेत मोठी भीती
Follow us
| Updated on: Jul 29, 2024 | 9:05 AM

अभिनेता रणबीर कपूर बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रणबीर कपूर याने बॉलिवूडला अनेक हीट सिनेमे दिले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत रणबीर याने खासगी आयुष्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. एवढंच नाही तर, अभिनेत्याने स्वतःच्या मृत्यूबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणबीर कपूर याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत, रणबीर कपूर याने बाप झाल्यानंतर आयुष्यात झालेले मोठे बदल सांगितले आहे. एवढंच नाही तर, राहा हिच्या जन्मानंतर अभिनेत्याला मृत्यूची भीती देखील सतावत आहे. रणबीर म्हणाला, ‘मी आता एक बाप आहे. मला एक मुलगी आहे. माझ्यासाठी ही गोष्ट गेम चेंजर ठरली आहे. कारण राहाच्या जन्मानंतर माझा देखील नवा जन्म झाला आहे.. असं मला वाटतं.’

‘मी गेल्या 40 वर्षात जे आयुष्य जगलो आहे, ते आयुष्य फार वेगळं होतं. आता मी नव्या भावना, नवे विचार अनुभवत आहे. मला पूर्वी मृत्यूची भीती वाटत नव्हती, पण राहाच्या जन्मानंतर मला मरणाची भीती सतावत आहे.’ एवढंच नाही कोणत्या वयात अभिनेत्याचं निधन होणार याबद्दल देखील रणबीर याने मोठा खुलासा केला आहे.

‘वयाच्या 71 व्या माला निधन येईल. कारण 8 क्रमांकासोबत माझं वेगळंच ऑबसेशन आहे. राहाच्या जन्मापूर्वीचे 30 वर्ष फार वेगळे होते. पण आता मी पूर्णपणे बदललो आहे. राहाच्या जन्मानंतर माझी सिगारेट पिण्याची देखील सवय सुटली आहे. वयाच्या 17 व्या वर्षापासूनम मी सिगारेट पित होतो. बाप झाल्यानंतर ही सवय मला अस्वस्थ करत होती. पण आता मी माझ्यातील वाईट सवयींचा त्याग करत आहे.’ असं देखील रणबीर कपूर म्हणाला.

सांगायचं झालं तर, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लेक राहा हिच्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असतात. सोशल मीडियावर देखील दोघांसोबत राहा हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. राहा देखील आता प्रसिद्ध सेलिब्रिटी किड्सच्या यादीत सामील झाली आहे.

रणबीर कपूर याचे सिनेमे

रणबीर कपूर याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्यानं ‘ॲनिमल’ सिनेमामुळे चाहत्यांच्या मनात आणि बॉलिवूडवर राज्य केलं. ‘ॲनिमल’ सिनेमाच्या यशानंतर रणबीर कपूर ‘ॲनिमल पार्क’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. रणबीर ‘रामायण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनेता ‘रामायण’ सिनेमात राम यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमात अभिनेत्री साई पल्लवी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.