Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते’ ब्रेकअप झालं नसतं तर, आज विवाहित असती तब्बू, अभिनेता जगतोय आनंदी आयुष्य

Tabu Love Life | अभिनेत्री तब्बू हिच्या आयुष्यात अनेक सेलिब्रिटींची झाली होती एन्ट्री, पण 'या' सेलिब्रिटीसोबत ब्रेकअपनंतर अभिनेत्रीने कधीच घेतला नाही लग्नाचा निर्णय, 'ते' ब्रेकअप झालं नसतं तर, आज तब्बू देखील इतर अभिनेत्रींप्रमाणे असती विवाहित... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तब्बू हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

'ते' ब्रेकअप झालं नसतं तर, आज विवाहित असती तब्बू, अभिनेता जगतोय आनंदी आयुष्य
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 7:50 AM

अभिनेत्री तब्बू वयाच्या 52 व्या वर्षी देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. नुकताच अभिनेत्री ‘क्रू’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमात तब्बू हिच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर आणि क्रिती सनॉन हिने मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई केली. पण आता तब्बू तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तब्बू हिने लग्न का केलं नाही? असा प्रश्न आजही चाहत्यांना असतो.

तब्बू हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या नावाची चर्चा अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत झाली. पण तब्बू एका सेलिब्रिटीच्या प्रेमात पूर्णपणे बुडाली होती. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. ते ब्रेकअप झालं नसतं, तर आज तब्बू हिचं देखील स्वतःचं एक कुटुंब असतं. अभिनेत्री विवाहित असती.

एक काळ असा होता, जेव्हा तब्बू हिच्या नावाची चर्चा दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला आणि अभिनेते नागार्जुन यांच्यासोबत सुरु होती. अक्किनेनी नागार्जुन यांच्यासोबत अभिनेत्रीचं फार घट्ट होतं. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट देखील केलं. नागार्जुन आणि तब्बू एक दोन नाहीतर, चक्क दहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

नागार्जुन आणि तब्बू यांच्या रिलेशनशिपची चर्चा फक्त झगमगत्या विश्वातच नाहीतर, चाहत्यांमध्ये देखील रंगू लागली होती. पण अभिनेता विवाहित असल्यामुळे नागार्जुन आणि तब्बू यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

तब्बू हिच्यासोबत लग्न करण्यासाठी नागार्जुन पत्नीला घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हते. तेव्हा तब्बू हिने ठरवलं की, लग्न होणार नसेल तर, ब्रेकअप करुन विभक्त व्हायचं. अशात नागार्जुन आणि तब्बू यांचं दहा वर्षांचं नातं काही क्षणात तुटलं. ब्रेकअपनंतर तब्बू हिने अनेक गोष्टींचा सामना केला.

नागार्जुन याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तब्बू हिच्या आयुष्यात कधी कोणाची एन्ट्री झाली नाही. त्यामुळे अभिनेत्रीने कधी लग्न करण्याचा देखील विचार केला नाही. म्हणून जर नागार्जुन आणि तब्बू यांचं ब्रेकअप झालं नसतं तर, अभिनेत्री आज विवाहित असती.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तब्बू हिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे. सांगायचं झालं तर, तब्बू गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. तब्बू हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांमध्ये तब्बू हिची असलेली क्रेझ आजही कमी झालेली नाही. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तब्बू हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.