हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाचे कारण अखेर समोर, ‘त्या’ इंस्टाग्राम पोस्टने सर्वकाही झाले स्पष्ट…
हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी घटस्फोट घेतलाय. दोघांनीही सोशल मीडियावर तशी पोस्ट देखील शेअर केलीये. काही दिवसांपासून यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू होती.
हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून फक्त त्याच्या क्रिकेटमुळेच नाहीतर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चांगलाच चर्चेत आहे. हार्दिक पांड्या याच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सांगितले जात होते. T20 मध्ये धमाकेदार खेळताना हार्दिक पांड्या हा दिसला. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांचा आज घटस्फोट झालाय. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केलीये. गेल्या कित्येक दिवसांपासून यांच्या घटस्फोटाची चर्चा होती. हेच नाहीतर नताशा हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले होते की, लवकरच एक व्यक्ती रस्त्यावर येणार आहे.
नताशा स्टॅनकोविक हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, जवळपास 4 वर्षांनंतर हार्दिक आणि मी संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघांनी एकत्र राहून आमचे बेस्ट दिले. पण आता दोघांनीही हाच निर्णय घेतला आहे. हा आमच्यासाठी नक्कीच खूप कठीण निर्णय होता. अगस्त्य आमच्या दोघांच्या आयुष्यात एक भाग राहिल. आम्ही दोघेही त्याला शक्य तितका आनंद देण्याचा प्रयत्न करू, असेही तिने म्हटले.
View this post on Instagram
नताशा ही हार्दिक पांड्यावर नाराज असल्याचे सांगितले जात होते. यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने म्हटले होते की, दोघांमध्ये वाद सुरू आहे. दोघांनाही हा वाद मिटवायचा नाहीये. हार्दिक पांड्या आणि नताशा या दोघांनी मिळून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. नताशा ही मुलाला घेऊन भारतातून निघून देखील गेलीये.
नताशा ज्यापद्धतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत होती, तेंव्हाच हार्दिक आणि नताशा यांच्या नात्याची पोलखोल होताना दिसली. कुठेही नताशा ही एकटीच स्पॉट होत होती. हेच नाहीतर अंबानींच्या लग्नातही हार्दिक पांड्या हा भाऊ आणि वहिणीसोबत पोहोचला होता. यावेळी नताशा कुठे आहे हा प्रश्न सातत्याने हार्दिक पांड्या याला विचारला जात होता.
ज्यावेळी नताशा हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले होते की, लवकरच एक व्यक्ती रस्त्यावर येणार त्या पोस्टनंतरही यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू होती. भारतीय संघाने T20 सामना जिंकला आणि जगभरातून भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता, त्यावेळी एक साधी पोस्टही नताशा हिने सोशल मीडियावर शेअर केली नव्हती.