गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचे मोठे भाष्य, म्हणाली, बिश्नोई…
Salman Khan : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. सलमान खान याच्या घरावर काही दिवसांपूर्वीच गोळीबार झाला. यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले.
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर 14 एप्रिल 2024 रोजी गोळीबार करण्यात आला. सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. हेच नाही तर लोक हैराण झाले. एक गोळी तर थेट सलमान खान याच्या घरामध्ये देखील गेली. हा गोळीबार ज्यावेळी झाला, त्यावेळी सलमान खान हा आपल्या घरातच होता. या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली. हेच नाही तर आतापर्यंत पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले. गेल्या कित्येक महिन्यांपासून या गोळीबाराचे प्लनिंग सुरू होते.
सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर अनेक सेलिब्रिटी हे सलमान खानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहचले. आता या गोळीबारानंतर सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने मोठे भाष्य केले आहे. सलमान खान आणि सोमी अली यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आहे. हेच नाही तर यांच्या लग्नाची देखील जोरदार चर्चा रंगताना दिसली.
सलमान खान आणि सोमी अली यांचे ब्रेकअप होऊन आता काही काळ झालाय. आता सोमी अली हिने दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, काहीही गोष्टी घडलेल्या असो परंतू, एखाद्या व्यक्तीला असे धमक्या देणे आणि हिंसा करणे चुकीचेच आहे. तो (सलमान खान) ज्या गोष्टीतून गेला, ती वेळ माझ्या शत्रूंवरही येऊ नये, असेही सोमी अलीने म्हटले.
पुढे सोमी म्हणाली, माझ्या प्रार्थना त्याच्यासोबत आहेत. माझा कायद्यावर विश्वास आहे. हेच नाही तर सोमी म्हणाली, सलमान खानला माफ करण्याची विनंती मी बिश्नोई समाजाला करते. त्याच्याकडून काही चूक झाली असेल तर त्याला माफ करावे. आता सोमी अली हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
सोमी अलीने स्पष्ट केले की, सलमान खान याच्या या वाईट काळात ती त्याच्यासोबत आहे. सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नक्कीच चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान हा दुबईला गेलो होता, यावेळी दुबईत धमाका करताना सलमान खान दिसला.