सलमान खान फायरिंग प्रकरणी मोठी अपडेट; त्या आरोपींना मोक्का; ‘या’ गँगस्टरच्या अडचणीत वाढ
Salman Khan home firing : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर सर्वजण हैराण झाले. पहाटे सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले. आता या प्रकरणात मोठी कारवाई पोलिसांकडून करण्यात आलीये.
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर 14 एप्रिल 2024 च्या पहाटे गोळीबार झाला. यावेळी सलमान खान हा आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत घरातच होता. या गोळीबाराच्या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सलमान खान याच्या चाहत्यांमध्येही चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. या गोळीबाराच्या घटनेचा सीसीटीव्ही पुढे आला. गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर पोलिसांनी वीस पथके तयार करत हल्लेखोरांना अवघ्या काही तासांमध्येच अटक केली. आता या गोळीबार प्रकरणात अत्यंत मोठे अपडेट पुढे आल्याचे बघायला मिळतंय.
सलमान खान याच्या घरावरील गोळीबारानंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली. सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली. लॉरेन्स बिश्नोई हा सध्या जेलमध्ये असून त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई हा अमेरिकेत आहे आणि तिथून तो भारतामध्ये गुन्हेगारीच्या घटना घडून आणत आहे.
सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करणारे हल्लेखोर विक्की गुप्ता आणि सागर पाल हे मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची कसून चाैकशी केली जातंय. आता थेट सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्याच्या प्रकरणानंतर लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई, विक्की गुप्ता आणि सागर पाल यांच्यावर मोक्का लावण्यात आलाय.
हेच नाही तर साबरमती जेलमध्ये असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रक्रिया देखील सुरू केलीये. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये लॉरेन्स बिश्नोई याने थेट सलमान खान याला जीवे मारण्याचे आपले ध्येय असल्याचे त्याने म्हटले हेच नाही तर ज्यादिवशी सलमान खानला मारेल त्यादिवशी मी गँगस्टर होईल, असेही त्याने म्हटले.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर लॉरेन्स बिश्नोईच्या अडचणीत वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. हल्लेखोरांना गुजरातमधील भुज येथून पोलिसांनी अटक केलीये. हे हल्लेखोर भुजच्या एका मंदिरात लपून बसले होते. सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणारे हे दोन्ही हल्लेखोर हे बिहारमधील असून होळी झाल्यानंतर चार दिवसांनी ते मुंबई आले होते. घरच्यांना मुंबईला कामासाठी जात असल्याचे सांगून त्यांनी घर सोडले.