गोळीबारानंतर सलमान खानचे वडील कडाडले, सलिम खान थेट म्हणाले, अशा लोकांसोबत..
सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. हैराण करणारे म्हणजे ज्यावेळी हा गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान हा घरातच उपस्थित होता. पोलिसांनी मोठी कारवाई करत हल्लेखोरांना अटकही केलीये. 10 दिवसांची पोलिस कोठडी यांना सुनावण्यात आलीये. मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे.
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडलीये. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळाले. हेच नाही तर रविवारची सकाळ सलमान खान याच्या चाहत्यांसाठी हैराण करणारी ठरली. पहाटे 4.55 ला सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. ज्यावेळी हा गोळीबार करण्यात आला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. हल्लेखोरांच्या निशाण्यावर सलमान खान याची बाल्कनी होती. हेच नाही तर एक गोळी सलमान खानच्या घरात देखील शिरली.
ईदच्या दिवशी ज्या बाल्कनीत उभे राहून आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देताना सलमान खान दिसला, त्याच बाल्कनीवर गोळीबार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहचले होते. गोळीबार करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, 10 दिवसांची पोलिस कोठडी देखील यांना देण्यात आलीये.
आता या प्रकरणावर सलमान खान याचे वडील सलिम खान यांनी मोठे भाष्य केले आहे. सलिम खान यांनी नुकताच एक मुलाखत दिलीये. यावेळी सलिम खान हे म्हणाले की, हे सर्व प्रकरण पोलिसांकडे आहे. या प्रकरणावर काही बोलण्यास किंवा यासंदर्भात मुलाखत देण्यास आम्हाला सध्या मनाई करण्यात आलीये. सलमान खान आणि कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीये. सलमान खान हा त्याचे काम करत आहे त्याला पूर्ण सुरक्षा पोलिसांची देण्यात आलीये.
पोलिसांनी सुरक्षेची जबाबदारी घेतलीये. पुढे सलिम खान नाव न घेता संतापत म्हणाले की, अशा मुर्ख लोकांसोबत काय बोलावले जे म्हणतात जीवे मारून टाकल्यानंतर समजेल. असा पागल माणूस आहे. पोलिसांनी सुरक्षेत वाढ केल्याचे सलिम खान यांनी देखील म्हटले आहे. सलिम खान हे ईदच्या दिवशी बाल्कनीत सलमान खान याच्यासोबत दिसले होते.
सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर अनेक जण हे सलमान खान याला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहचले. या गोळीबारावर सलमान खान याने काहीच भाष्य केले नाहीये. सलमान खानचे वडील सलिम खान आणि भाऊ अरबाज खान याच्यावर भाष्य करताना दिसले आहेत. आता हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणात काही मोठे खुलासे हे नक्कीच केले जाऊ शकतात.