‘दाऊद तुला वाचवेल या भ्रमात राहू नकोस’; धमकीनंतर पोलिसांकडून सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा

काळवीट हत्येप्रकरणी अडकलेल्या सलमानला धमकी दिल्यामुळे बिश्नोई चर्चेत आला होता. त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत लॉरेन्सने पुन्हा एकदा सांगितलं की सलमानने त्यांच्या समाजाची माफी मागायला हवी. आता रविवारी सोशल मीडियावर पुन्हा एकदा धमकीची पोस्ट लिहिण्यात आली.

'दाऊद तुला वाचवेल या भ्रमात राहू नकोस'; धमकीनंतर पोलिसांकडून सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा
Lawrence Bishnoi and Salman KhanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 8:33 AM

मुंबई : 29 नोव्हेंबर 2023 | अभिनेता सलमान खानला धमकी देणारी पोस्ट सोशल मीडियावर दिसल्यानंतर मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या सुरक्षेचा आढावा घेतला. सलमानला आधीच वाय प्लस (Y Plus) दर्जाची सुरक्षा मुंबई पोलिसांकडून देण्यात आली होती. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली होती. रविवारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून फेसबुकवर धमकीची पोस्ट लिहिण्यात आली होती. ही पोस्ट पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालला उद्देशून होती. “तू सलमान खानला भाऊ मानतोस, पण आता वेळ आली आहे की तुझ्या भावाने समोर येऊन तुला वाचवावं”, अशी धमकी या पोस्टद्वारे देण्यात आली होती.

धमकीची पोस्ट

“हा संदेश सलमान खानसाठीही आहे. तुला दाऊद वाचवेल या भ्रमात राहू नकोस. तुला कोणीच वाचवू शकत नाही. सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर तू दिलेल्या नाट्यमयी प्रतिक्रियेकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं नाही. आम्हा सर्वांना ही गोष्ट माहीत आहे की तू व्यक्ती म्हणून कसा होता आणि त्याचे गुन्हेगारी संबंध कसे होते? तू आमच्या रडारवर आहेस. याला ट्रेलर असं समज, संपूर्ण चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. तुला ज्या देशात पळायचं असेल तिथे पळ पण एक गोष्ट लक्षात ठेव की मृत्यूला व्हिसाची गरज नसते. मृत्यू कोणत्याही आमंत्रणाशिवाय येऊ शकतो”, अशी धमकी या पोस्टमधून देण्यात आली आहे.

गिप्पी ग्रेवालचं स्पष्टीकरण

कॅनडामधील वॅनकॉवर इथल्या गिप्पी ग्रेवालच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. याची जबाबदारीसुद्धा बिश्नोईने घेतली आहे. या घटनेनंतर ग्रेवालने स्पष्ट केलं की सलमान त्याचा मित्र नाही. सलमानशी त्याची फक्त दोनदा भेट झाली होती. आता या धमकीच्या पोस्टनंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. “धमकीची पोस्ट कोणी लिहिली आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लिहिलं आहे. सोशल मीडिया अकाऊंट खरंच बिश्नोईचं आहे का, याचाही तपास सुरू आहे. इंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस शोधण्याचाही प्रयत्न करतोय”, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

नोव्हेंबर 2022 नंतर सलमानला वाय प्लस दर्जी सुरक्षा पुरविण्यात आली. इतकंच नव्हे तर खासगी पिस्तुल बाळगण्याचीही परवानगी सलमानला देण्यात आली आहे. याशिवाय सलमानने नवीन बुलेटप्रूफ गाडी खरेदी केली आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.