घराबाहेरील गोळीबारानंतर पहिल्यांदाच सलमान खानची ‘ती’ पोस्ट, चाहते म्हणाले..
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबारानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय.
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांसाठी कालची सकाळ अत्यंत हैराण करणारी ठरली. सलमान खान याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार केल्याची हैराण करणारी घटना घडली. हेच नाही तर एक गोळी थेट सलमान खान याच्या घरात शिरली. या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. ज्यावेळी गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. धक्कादायक म्हणजे ज्या बाल्कनीत उभे राहून सलमान खान हा ईदच्या शुभेच्छा चाहत्यांना देताना दिसला, त्याच बाल्कनीच्या आसपास हा गोळीबार करण्यात आलाय.
गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर झालेल्या गोळीबारानंतर सलमान खानच्या वडिलांनी यावर प्रतिक्रिया दिली. मात्र, सलमान खान याने काहीच यावर भाष्य केले नाही. सलमान खान याला भेटण्यासाठी सतत लोक जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील सलमान खान याला गोळीबारानंतर भेटायला गेल्याचे बघायला मिळाले.
सलमान खान याने नुकताच एक पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर केलीये. आता सलमान खानची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसतंय. मात्र, गोळीबारावर काहीच भाष्य या व्हिडीओमध्ये सलमान खान याने केली नाहीये. सलमान खान याने शेअर केलेली ही पोस्ट ब्रॅंड प्रमोशनची आहे. मात्र, या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
अनेकांनी सलमान खान याला आम्ही तुमच्यासोबत असल्याचे देखील म्हटले आहे. लोक सतत सलमान खान याच्या या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत. गोळीबारानंतर सलमान खान याच्या घराच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये. सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याचा धमक्या या मिळताना दिसत आहेत.
लॉरेन्स बिश्नोई हा सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देतोय. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्येही लॉरेन्स बिश्नोई याने म्हटले होते की, माझ्या जिवण्याचे एकच ध्येय आहे ते म्हणजे सलमान खान याला जीवे मारणे. मी स्वत:ला अजून गॅंगस्टर मानत नाही, ज्यावेळी मी सलमान खान याला जीवे मारेल, त्यादिवशी मी गॅंगस्टर मानेल.