Gadar 2 | सनी देओल झाला अत्यंत भावूक, ‘गदर 2’ची 400 कोटींची कमाई, अभिनेता चाहत्यांना म्हणाला…
बाॅलिवूड अभिनेता सनी देओल हा त्याच्या गदर 2 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. गदर 2 हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. गदर 2 ने मोठी कमाई करण्यास सुरूवात केलीये. मुळात म्हणजे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. तूफान कमाई चित्रपट करतोय.
मुंबई : सनी देओल याचा गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावे केले आहेत. सनी देओल हा फक्त त्याच्या चित्रपटामुळेच नाही तर त्याच्या पर्सनल लाईफमुळेही जोरदार चर्चेत आहे. सनी देओल याच्या पर्सनल लाईफमध्ये मोठ्या समस्या सुरू असल्याचे काही दिवसांपूर्वीच पुढे आले. आर्थिक अडचणीमध्ये सनी देओल हा अडकलाय. विशेष म्हणजे गदर 2 या चित्रपटाचे (Movie) जोरदार प्रमोशन करताना सनी देओल हा दिसला आहे. सनी देओल याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले.
सनी देओल याच्या गदर 2 चित्रपटाची तूफान कामगिरी ही बाॅक्स आॅफिसवर सुरू आहे. आता गदर 2 या चित्रपटाने 400 कोटींचा मोठा टप्पा हा नुकताच पार केलाय. लवकरच चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होईल असे सांगितले जात आहे. हा चित्रपट 11 आॅगस्ट रोजी रिलीज झाला आणि याने धमाका करण्यास सुरूवात केली.
400 कोटींच्या क्लबमध्ये गदर 2 हा चित्रपट सहभागी झाल्यानंतर सनी देओल याने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये बोलताना सनी देओल हा खूप जास्त भावूक झाल्याचे बघायला मिळाले, आता सनी देओल याचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
View this post on Instagram
सनी देओल याने या व्हिडीओच्या सुरूवातीला चित्रपटाला प्रेम दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. सनी देओल म्हणाला की, तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सर्वांना हा चित्रपट इतका जास्त आवडेल असा मी विचार देखील केला नव्हता. आम्ही 400 कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. या पुढेही जाणार आहोत.
हे सर्व तुमच्यामुळेच होऊ शकले, कारण तुम्हाला चित्रपट आवडला. तुम्हाला तारा सिंह आवडला, शकीना आवडली आणि त्यांचे पूर्ण कुटुंब आवडले. त्यामुळे थॅक्यू थॅक्यू थॅक्यू हे सर्व बोलताना सनी देओल याचे डोळे पाणावले होते. आता चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. चाहत्यांना सनी देओल याचा हा व्हिडीओ प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.