हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांचा वाद चव्हाट्यावर, T20 विश्वचषकच्या विजयानंतरही नताशा हिने एकही…

Hardik Pandya and Natasa Stankovic : हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या क्रिकेटसोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळेही जोरदार चर्चेत आहे. हार्दिक पांड्या याच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सांगितले जाते. हार्दिक पांड्या आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू असल्याची सातत्याने चर्चा रंगताना दिसत आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांचा वाद चव्हाट्यावर, T20 विश्वचषकच्या विजयानंतरही नताशा हिने एकही...
Hardik Pandya and Natasa Stankovic
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 2:52 PM

T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत भारताने इतिहास रचला. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर एक मोठा जल्लोष भारतीयांमध्ये बघायला मिळाला. लोक रस्त्यावर उतरून आपला आनंद व्यक्त करताना दिसले. हेच नाहीतर भारतीय खेळाडूंना देखील आपले अश्रू रोखता आले नाहीत. जगभरातून भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून टीमचे काैतुक केले. प्रत्येक भारतीयासाठी हा क्षण अभिमानाचा नक्कीच होता.

अनेक कलाकारांनी इंडिया टीमचे काैतुक करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्या याने धमाकेदार कामगिरी केली. गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा तूफान रंगताना दिसतंय की, हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आलंय आणि लवकरच हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांचा घटस्फोट होतोय.

यासोबत काही दिवसांपूर्वीच नताशा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, लवकरच एक व्यक्ती रस्त्यावर येणार आहे. सतत हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा असतानाच नताशा हिने इंडिया टीमच्या विजयानंतर एकही पोस्ट सोशल मीडियासाठी शेअर केली नाहीये. यामुळे आता परत घटस्फोटाची चर्चा सुरू आहे.

नताशा ही हार्दिक पांड्याला सपोर्ट करण्यासाठी सामन्यावेळी स्टेडियममध्ये दिसत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती स्टेडियममध्ये देखील दिसत नाही. त्यामध्येच तिने T20 विश्वचषक 2024 च्या विजयानंतरही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली नाहीये. यामुळे हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित नसल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

नताशा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. सतत चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच नताशा दिसते. हेच नाहीतर तिने काही वेळापूर्वीच जिममधील एक व्हिडीओ शेअर केला. मात्र, भारतीय संघाचा किंवा हार्दिक पांड्यासाठी तिने पोस्ट शेअर केली नाहीये. मध्यंतरी अशीही चर्चा होती की, हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट अगोदरच झालाय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.