केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर अथिया शेट्टीची ‘ही’ पोस्ट, म्हणाली, वादळानंतर..
बाॅलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी ही कायमच चर्चेत असते. अथिया शेट्टीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अथिया शेट्टी ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे, मात्र असे असतानाही अथिया शेट्टी ही चर्चेत आहे. अथिया शेट्टी हिने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. ज्यानंतर विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.
बाॅलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी ही कायमच चर्चेत असते. अथिया शेट्टी ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अथिया शेट्टी कायमच दिसते. अथिया शेट्टी हिने 2023 मध्ये क्रिकेटर केएल राहुल याच्यासोबत लग्न केले. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी लग्न केले. लग्नाच्या अगोदरही अथिया शेट्टी ही केएल राहुल याचा सपोर्ट करण्यासाठी कायमच स्टेडियममध्ये पोहचत असत. सध्या केएल राहुल याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.
तो व्हिडीओ पाहून लोकांमध्ये प्रचंड असा संताप हा बघायला मिळतोय. लखनऊ सुपर जायंट्सने सामना हारल्यानंतर केएल राहुल आणि लखनऊ टिमचे मालक संजीव गोयंका यांच्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये संजीव गोएंका केएल राहुलसोबत बोलताना दिसत आहेत. त्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून स्पष्ट दिसतंय की, केएल राहुलवर संजीव गोयंका हे भडकले आहेत.
या व्हिडीओनंतर लोक टिमच्या मालकाला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. मुंबईमध्ये 13 मे ला मोठे वादळ आले होते आणि त्यानंतर पाऊस देखील पडला. आता तोच फोटो शेअर करत अथिया शेट्टीने एक पोस्ट शेअर केलीये. अथिया शेट्टीने वादळानंतरची शांतता, म्हणत खास फोटो शेअर केलाय. लोक आता या पोस्टचे कलेक्शन त्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओसोबत जोडत आहेत.
या पोस्टमधून अथिया शेट्टीने खास संदेश दिल्याचे देखील सांगितले जातंय. मात्र, ज्याप्रमाणे टिमचे मालक संजीव गोयंका हे केएल राहुल याला बोलत होते, ते चाहत्यांना अजिबातच आवडले नसल्याचे बघायला मिळतंय. शेवटी काहीही झाले तरीही केएल राहुल हा भारतीय क्रिकेटर आहे आणि त्याला अशाप्रकारे बोलणे चुकीचेच असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे, लोक संजीव गोयंका यांना खडसावताना दिसत दिसत आहेत.
अथिया शेट्टी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. अथिया शेट्टी हिने केएल राहुल याच्या वाढदिवसाला खास अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. हेच नाही तर जावयासाठी सुनिल शेट्टी यांनीही खास पोस्ट शेअर केली होती. अथिया शेट्टी ही सध्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असतानाही कायमच सोशल मीडियावर अथिया शेट्टी ही सक्रिय दिसते.