Pathaan: ‘पठाण’ची मुख्य व्हिलन दीपिकाच, शाहरुखला देणार धोका; ट्विटरवर का होतेय इतकी चर्चा?

भगवी बिकिनी नाही तर 'या' गोष्टीवरून नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा; 'पठाण'चा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते दीपिकावर नाराज

Pathaan: 'पठाण'ची मुख्य व्हिलन दीपिकाच, शाहरुखला देणार धोका; ट्विटरवर का होतेय इतकी चर्चा?
Pathaan: 'पठाण'ची मुख्य व्हिलन दीपिकाच, शाहरुखला देणार धोका?
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 11:39 AM

मुंबई: ‘पठाण’चा ट्रेलर प्रदर्शित होताच अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर दीपिकाविषयी चर्चा सुरू आहे आणि यावेळी ही चर्चा भगव्या बिकिनीबद्दल नाही तर दुसऱ्या एका विषयावरून आहे. ट्विटरवर नेटकऱ्यांनी दीपिकावर नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी ‘पठाण’मधील तिच्या भूमिकेवरून व्यक्त होत आहे. मंगळवारी यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत निर्मिती झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत.

जवळपास अडीच मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये जॉन अब्राहम हा दहशतवादाच्या भूमिकेत दिसतोय, जो भारतावर हल्ला करण्याबद्दल बोलत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहरुख आणि दीपिका सैनिकांच्या भूमिकेत आहेत. देशाला वाचविण्याचं मिशन या दोघांवर सोपविण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

या ट्रेलरमध्ये दीपिका शाहरुखला त्याच्या मिशनमध्ये साथ देणार असल्याचं म्हणते. यामध्ये जबरदस्त ॲक्शन सीन्सचा भरणा पहायला मिळतो. फक्त शाहरुख आणि जॉनच नाही तर दीपिकासुद्धा यामध्ये ॲक्शन मोडमध्ये दिसते. तिच्या याच अॅक्शन सीनवर नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

चित्रपटात केवळ जॉनच नाही तर दीपिका पदुकोणसुद्धा मुख्य व्हिलन आहे, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. ‘पठाणचा ट्रेलर पाहून असं वाटतंय की दीपिका नकारात्मक भूमिकेत आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘दीपिकाच इथे मुख्य खलनायक आहे, जॉन नाही’, असं दुसऱ्याने लिहिलंय.

दीपिकाच्या भूमिकेत गूढ असल्याचा अंदाजही नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. पठाण हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख, दीपिकासोबत जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.